कला माणसाला प्रगल्भ बनवते…!
कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कला ही माणसाला प्रगल्भ बनवत असते.जीवनानुभव घ्यायला शिकवते, पाठ्यपुस्तकाबरोबर चित्रकला विद्यार्थ्याच्या सृजनशिलतेचा विकास करते असे मत जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी व्यक्त केले.
श्रीगोंदे शहरातील रयत शिक्षण संस्थेची राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयातील इयत्ता ९ वी मधील विद्यार्थींनी समृध्दी राजु डाके या बालचित्रकार चिमुकलीने लाॅकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग करत पेन्सिलच्या माध्यमातुन अनेक व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत,त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेतील अभिनेते खा.अमोल कोल्हे,महात्मा ज्योतिबा फुले,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,क्रिकेटर ऋतुराज गायकवाड यांची रेखाचित्रे आहेत.कसलेही प्रशिक्षण न घेता तिने चित्रकलेची कला आत्मसात केली आहे.
नुकतेच सिना धरणग्रस्तांचे नेते दिवंगत पांडाभाऊ उगले यांचे रेखाचित्र तिने रेखाटले होते,ते रेखाचित्र डाके कुटुंबियांनी थिटेसांगवी ग्रामस्थांना भेट दिले,त्यावेळी आयोजित कार्यक्रमात नागवडे बोलत होत्या,त्या पुढे म्हणाल्या कि चित्रकला हा एक कलेचा प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार यातून दिसून येतो .माणसाला जगायला शिकविते ती म्हणजे कला आणि कला माणूस पणा कडे नेण्याची पायवाट आहे.भरभरत्या जखमेवर फुंकर घालण्याचे काम या साऱ्या कला करतात.कला ही विरंगुळा नसून माणसाला – समाजाला, सुसंस्कृत, संवेदनशील बनवते.कला ही एक ईश्वर देणगी आहे ,तिचा जीवन फुलवण्यासाठी उपयोग केला पाहिजे.डोळ्यांची नजर,मन,हातातली लय हे एकमेकांमध्ये भिडतात ,तेव्हा कोणतीही कलाकृती सुंदर होते.शालेय व चित्रकला साहित्य भेट देऊन नागवडे यांनी समृध्दी डाके हिचे कौतुक केले.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, जिल्हा सरचिटणीस राहुल साळवे,पै.बलभिम शेळके,किसनदादा उगले,डाॅ.बाळासाहेब उगले,दत्तात्रय उगले,प्रा.एस.पी गोलांडे,प्राचार्य.अमोल नागवडे, प्रा.विक्रम शिंदे,लहु हिरडे,विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष अदिल शेख,प्रा.गोरख उगले,राजु डाके,सीमा राजु डाके आदी उपस्थित होते.आभार प्रा.कानिफनाथ उगले यांनी मानले.