प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याने समाधान मोरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घेतले जबाब.
शवविच्छेदन रिपोर्ट दोन वेगवेगळे आल्याने कारवाई करण्यासाठी प्रहार संघटना आक्रमक.
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील मौजे एरंडोली येथील मयत समाधान अंकुश मोरे या युवकाचा 15 जुलै रोजी मृत्यू झाला असून श्रीगोंदा येथील पोलिसांनी पंचनामा न करता डेड बॉडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आली. व श्रीगोंदा शासकीय रुग्णालयाचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट हा हँगिंग म्हणून आल्याने तो संशयात्मक असल्यामुळे नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी तो मान्य न करता पुणे येथील ससून रुग्णालय येथे दुसरे शवविच्छेदन करण्यात आले.
ससून रुग्णालयातील रिपोर्ट मध्ये डोक्याला व छातीला मार लागल्याने मृत्यू झाला असल्याची रिपोर्ट आल्याने श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील रिपोर्ट व पुणे येथील ससून रुग्णालयातील रिपोर्ट हे वेगवेगळे आल्याने आरोपींना पाठीशी घालणाऱ्या श्रीगोंदा पोलीस व डॉक्टर याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करुन त्यांना निलंबन करण्याची मागणी प्रहार संघटनेच्या वतीने विनोदसिंग परदेशी यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदनाद्वारे केली होती.
या प्रकरणी आज प्रहार चे विनोदसिंग परदेशी याचा जबाब घेण्यात आला त्यामध्ये म्हटले आहे की 19 वर्षीय मयत समाधान अंकुश मोरे यांना पांडुरंग उडे व दिलीप मांडे यांनी कामासाठी घरातून घेऊन गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी समाधान मोरे चा भाऊ संतोष मोरे याला सकाळी दिलीप मांडे यांनी फोन करून बोलावून घेतले व सांगितले की समाधान मोरे मयत झाला आहे. त्याने फाशी घेतली असे सांगण्यात आले.
परंतु त्याच्या डोक्यावर व छातीवर मार असल्याने समाधान मोरेचा खून झाला असताना देखील श्रीगोंदा पोलिसांनी व डॉक्टरांनी आरोपींना पाठीशी घातले आहे. असे मयताचे चुलते रामदास मोरे यांनी व इतर नातेवाईकांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय संदर्भात सहकार्य करण्यास सांगितले सदर माहितीचे नातेवाईकांना न्याय मिळणे कामे प्रहार च्या माध्यमातून सदर गुन्ह्यातील आरोपींवर व सदर कर्तव्यात कसूर केलेले सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच संबंधित डॉक्टर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत चा जबाब घेण्यात आला यावेळी प्रहार चे विनोदसिंग परदेशी, जिल्हा समन्वयक विजयराव भंडारे समवेत सरपंच संजयराव इथापे, मा.सरपंच बाळासाहेब जगताप, बाळासाहेब सोनवणे, रामदास मोरे, केतन मोरे, रूपाली मोरे, संजय शेळके, प्रदीप इथापे, तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब पठारे आदी उपस्थित होते.