श्रीरामनवमीला शहरात रंगणार गीत रामायण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

श्रीरामनवमीला शहरात रंगणार गीत रामायण

नगरकरांना सहभागी होण्याचे आवाहन

डॉक्टर, गायक, कलाकारांचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डॉक्टर गायक कलाकारांनी शहरात महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या व स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतरामायण या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीराम नवमीनिमित्त बुधवारी (दि.17 एप्रिल) संध्याकाळी 5:30 वाजता माऊली संकुलच्या सभागृहामध्ये सर्व नगरकरांसाठी हा कार्यक्रम निशुल्क ठेवण्यात आला आहे.  या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर कलाकारांच्या वतीने करण्यात आले आहे.

गीत रामायण मधील विविध गीतांचे सादरीकरण गायक कलाकार डॉ. विलास जोशी, पल्लवी जोशी, डॉ. योगिनी वाळिंबे, डॉ. स्मिता केतकर, डॉ. रोहिणी काळे, डॉ. शिरीष कुलकर्णी, डॉ. अविनाश वारे, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. सचिन पानपाटील करणार आहेत. या कार्यक्रमात डॉ. राजीव सूर्यवंशी रामकथा सांगणार  आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!