श्रीरामपूर येथे विवाहितेची आत्महत्या नसून घातपात;सदर प्रकरणी चौकशी करुन आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधिक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथे विवाहितेची आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करुन या प्रकरणी चौकशी करुन पीडितास न्याय मिळण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात दिले. तसेच नाशिक जिल्हाध्यक्षा भावनाताई हागवणे यांनी देखील विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन दिले.

श्रीरामपूर येथे 22 ऑक्टोंबर रोजी माधुरी उमेश बोराडे या नवविवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे स्वरुप देण्यात आले आहे.मात्र ही आत्महत्या नसून, विवाहित महिलेचा घातपात करण्यात आला आहे.

धामणगाव (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील माधुरीचे लग्न 27 नोव्हेंबर 2020 रोजी उमेश बोराडे या युवकाशी झाला होता. खाजगी नोकरीवरुन बदली झाल्याने नवीन दांम्पत्य श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथे राहण्यास आले. लग्नानंतर उमेशने फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन पैसे आनण्यासाठी आपल्या पत्नीस त्रास देण्यास सुरुवात केली. विवाहितेचे मानसिक व शारीरिक छळ करुन मारहाण करण्याचा प्रकार सुरु होता. तसेच उमेशचे विवाहबाह्य संबंध असल्याने तो पत्नीचा छळ करत होता.

माधुरी ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची गोल्ड मेडल मिळवलेली अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तसेच तिने एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी देखील सुरु केली होती. मात्र तिचा घातपात करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होत असताना,आरोपी मोकाट फिरत आहे. ही प्रकरणे गांभीर्य हाताळून आरोपींना कठोर शिक्षा झाल्यास अशा घटनांना अळा बसणार आहे.

श्रीरामपूर येथील नवविवाहितेला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणी चौकशी करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा  पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याच इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!