श्री आनंद कॉलेज ऑफ फार्मसीच्या माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मैत्री दिनाचा सेलिब्रेशन स्नेहांकुरला मदत देऊन साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवक-युवतींनी विविध प्रकारे मैत्री दिनाचे सेलिब्रेशन केले. मात्र या दिवशी 15 वर्षानंतर एकत्र आलेल्या श्री आनंद कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या मित्र-मैत्रिणींनी सामाजिक जाणिव ठेऊन केडगाव येथील स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रात मदतीचा हात देऊन आगळ्यावेगळ्या पध्दतीने मैत्री दिन साजरा केला.

श्री आनंद कॉलेज ऑफ फार्मसी (ता. पाथर्डी) येथील फार्मसीचे सन 2005 – 2006 च्या बॅचमधील सर्व माजी विद्यार्थी मैत्री दिन साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. पियुष लोढा व प्राजक्ता जोशी यांनी पुढाकार घेऊन शहरातील एका हॉटेलमध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. ढोल-ताशांच्या गजरात सर्वांना स्वागत माळ देऊन वर्गमित्र कपिल बोकरिया, प्रितम गांधी, आनंद गुगळे, विनीत कासवा यांनी स्वागत केले. सर्व मित्रांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मनातलं ओझं कमी करण्याच हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री होय. मित्र-मैत्रिण आपले सुख-दु:ख एकमेकांना वाटत असतात, असे सांगून पायल लोढा हिने मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.ऋषिकेश राठोड आणि शिल्पा राठोड यांनी उपस्थितांना भेटवस्तू देऊन मुच्युअल फंड व एसआयपीच्या गुंतवणूकीबद्दल मार्गदर्शन केले.

सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राला भेट देऊन विविध आवश्यक वस्तूंची भेट दिली. यावेळी प्रफुल्ल मुनोत, अभिजित भंडारी, गौरव पाथरकर, चेतन गांधी, निलेश ओस्तवाल, वर्धमान गुगळे, श्रीराम डोळसे, मुकेश मुथा, सचिन जाधव, संतोष बाफना, ज्ञानेश्‍वर बडे, जगदिश लोहिया, भागवत म्हस्के, अशोक पाडळे, राजश्री सावज, अंजली मोरे, स्नेहल बरडीया, वैशाली अडागळे, ऋतुजा ढाकणे, कल्याणी खेडकर आदी युवक-युवती उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!