अहमदनगर प्रतिनिधी – महेश कांबळे
भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या पिंपळगाव रोठा.ता.पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबाचे देवदर्शन भाविकांना घेण्यास घटस्थापनेपासून सुरुवात झाल्याने भाविकांत उत्साह दिसत असून मंदिरात विधीवत घटस्थापना होऊन नवरात्र सुरू झाली आहे.
नवरात्रीत नऊ दिवस भाविकांना खंडोबाचे शृंगार स्वरूपातील दर्शन घेता येणार आहे दर्शनासाठी शासकीय नियम पाळून सुरवात झाल्याने मोठ्या उत्साहाने खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सुरवात झाली आहे.
पहाटे पाच वा.देवाचे मंगलस्नान ज्ञानदेव माऊली घुले,रामदास मुळे,मोहन घुले,पुजारी देवीदास क्षीरसागर यांच्या हस्ते झाले यानंतर चांदीच्या सिंहासनाचे अनावरण करण्यात आले.सिंहासनावर चांदीच्या उत्सव मुर्ती व साजशृंगार चढविण्यात आला यानंतर हार फुले माळा चढवून सकाळी सहा वा.पुरोहित बंडोपंत पाटील यांच्या हस्ते देवाचा अभिषेक महापुजा महाआरती करण्यात आली.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड,विश्वस्त किसन मुंढे,उपसरपंच महादेव पुंडे,माजी सरपंच शिवाजी ढोमे,जालिंदर खोसे,गोपीनाथ घुले आदी उपस्थित होते.
यानंतर कोरानाचे नियम पाळून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.परिसरातील खंडोबा म्हाळसा घोड्यावरील पितळी मुर्ती मंदिर,गगनगिरी महाराज ध्यान मंदिरही भाविकांसाठी खुले करण्यात आले.
भाविकांसाठी दर्शनासाठी सकाळी आठ ते संध्या.सात अशी वेळ असून भाविकांनी दर्शनासाठी येताना सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घ्यावे,भाविकांनी एकाच वेळेस गर्दी करू नये असे आवाहन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले.