श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या अध्यक्षपदी उद्योजक रविराज भालेराव यांची नियुक्ती

0
143

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात सामाजिक कार्य करणार्‍या श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या अध्यक्षपदी उद्योजक रविराज भालेराव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव नरेश राऊत यांनी दिली.

श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलसंधारण, गरजू विद्यार्थींना संगणक शिक्षण, वाचनालय, शिवणकाम, वैद्यकीय, मुलींसाठी निवासी वस्तीगृह, महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिनचे प्रकल्प आदी कार्य सुरू आहे. अनेक मान्यवर या संस्थेचे विश्‍वस्त असून, उद्योग श्री चे प्रणेते रविराज भालेराव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

रविराज भालेराव हे औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच गरजूंना मदत करुन विविध सामाजिक उपक्रम ते राबवित असतात. या निवडीबाबत उद्योग श्री ग्रुप मराठा, सर्व विश्‍वस्त व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here