श्री मार्कंडेय मंदिर देवस्थानच्या जीर्णोद्धाराला विरोध नाही – अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम

- Advertisement -

पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाची माहिती

श्री मार्कंडेय मंदिर देवस्थानच्या जीर्णोद्धाराला विरोध नाही – अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम

नगर : गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिर येथे बेकायदेशीर लोकांकडून स्वयंघोषित ट्रस्टी यांच्यामार्फत जीर्णोद्धार करण्याचे ठरले आहे मात्र या ठिकाणी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाची मार्कंडेय शाळा असून समन्वयाने प्रश्न मार्गी लागावा यासाठी मंदिर जीर्णोद्धाराचे समन्वयक श्रीकांत छिंदम व मुख्याध्यापक संदीप छिंदम यांच्या उपस्थितीत समाजाची बैठक संपन्न झाली व शाळेला जागा द्यावी व बांधकाम करताना मंदिर व शाळेच्या बांधकामाचे प्लॅन एकत्र मंजुरीसाठी पाठवण्यात यावे आणि एकत्र बांधकाम सुरू करावे तसेच देवस्थान व शाळा यांच्यात बांधकामाबाबत करार करण्यात यावा असे ठरले असताना हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पद्मशाली समाजाच्या अनेक वेळा बैठका संपन्न झाल्या मात्र मूळ प्रश्न बाजूला ठेवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम करण्यात येत असून पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचा श्री मार्कंडेय मंदिर देवस्थानच्या जीर्णोद्धाराला विरोध नसून बेकायदेशीर स्वयंघोषित ट्रस्टला विरोध आहे अशी माहिती पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम यांनी दिली.

गांधी मैदान येथील श्री मार्कडेय मंदिराबाबत पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाची बैठक संपन्न झाली यात अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम  यांनी माहिती दिली यावेळी सचिव डॉ.रत्ना बल्लाळ, शरद क्यादर, राजेंद्र म्याना, शंकर सामलेटी, मुख्याध्यापक संदीप छिंदम आदी उपस्थित होते.

शरद क्यादर म्हणाले की श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्ट या संस्थेवर आज अखेर कोणीही अधिकृत ट्रस्टी व पदाधिकारी नाहीत श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्याबद्दल अर्ज उप धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांनी कायदेशीर फेटाळला आहे असे असताना पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या विरोधात काम करणारे काही लोक व विरोधी गटातील काही विघ्नसंतोषी लोक हे एकत्र येत त्यांनी बनावट निवडणूक घेतल्याची कागदपत्रे तयार करून तसा अर्ज सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात दाखल केलेला आहे त्या अर्जावर हरकत घेतलेली आहे असे असतानाही आम्हाला असे समजते की काही स्वयंघोषित विश्वस्त यांनी विघ्नसंतोषी लोकांना हाताशी धरून चुकून धर्मदाय आयुक्त यांच्या परिशिष्ट १ वर नाव असल्याचा गैरफायदा घेऊन एका 85 वर्षीय वृद्ध इसमाची फसवणूक करून अहमदनगर महापालिकेच्या बांधकाम परवानगी अर्जावर सही घेऊन तसेच परवानगीसाठी अर्ज सादर करताना खोटे कागदपत्रे सादर करून आयुक्त अहमदनगर महापालिका यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवली, मात्र कोणत्याही धर्मदाय संस्थेच्या मालमत्तेची विक्री, सुधारणा, जीर्णोद्धार करायचा असल्यास धर्मदाय आयुक्त यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून त्याची लेखी परवानगी घेऊन त्यानंतरच बांधकाम परवानगी मिळते पण श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान यांनी अशी कोणतीही परवानगी घेतलेली नाही व तसा कोणताही अर्ज अखेर सादर केलेला नाही तरी देखील बेकायदेशीरपणे भूमिपूजन सोहळा करण्याचे ठरविलेले आहे अशी माहिती यावेळी दिली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles