- Advertisement -
श्री विद्या निकेतनच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
सायन्स इतकेच कॉमर्स क्षेत्रही करिअरसाठी उत्तम पर्याय – मोहनलाल मानधना यांचे प्रतिपादन
श्री विद्या निकेतन क्लासेस च्या वतीने 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या स्टेट बोर्ड व सीबीएसई बोर्ड च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मोहनलाल मानधना, तसेच कालरा स्टडी सेंटरच्या संस्थापिका प्रा. सौ किरण कालरा उपस्थित होत्या.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रा.आसमा सय्यद यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. सौ. अपर्णा कुलकर्णी यांनी केला.
तसेच श्री विद्यानिकेतन क्लासेस मध्ये शैक्षणिक उपक्रमाचा अहवाल प्रा.सिद्धार्थ भिंगारकर यांनी दिला. यावेळी प्रा. राहुल कुलकर्णी,प्रा. प्रतीक सुंबे,प्रा. मनोहर जिंदम, श्री योगेश साळुंके, प्रा.यश ओहोळ, प्रा.कैलास जाधव प्रा.क्षितिजा होशिंग, प्रा.मनीषा भिंगरकर इत्यादी शिक्षक उपस्थित होते.
या शैक्षणिक वर्षात एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या52 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण मिळाले सीबीएससई बोर्डाच्या 21 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण मिळाले. सीबीएसईच्या पुष्कर कापकर या विद्यार्थ्याने गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळवले.
श्री विद्या निकेतन क्लासमध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते. आपल्या मनोगतात प्रसिद्ध उद्योजक व रामकृष्ण एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. मोहनलाल मानधना यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले त्यांच्या आवडीच्या क्षेत्राकडे जाण्यासाठी पालक म्हणून आपण प्रोत्साहन दिले पाहिजे, विद्यार्थ्यांचा कल पाहून क्षेत्र निवडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, त्यांच्याकडे पालकांनी विशेष लक्ष देऊन त्यांना उत्तम संस्कार द्यावे, जेणेकरून तो विद्यार्थी आदर्श नागरिक बनतील, ते म्हणाले की सायन्स क्षेत्राएवढेच कॉमर्स क्षेत्रातही करिअरच्या उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत. सौ.किरण कालरा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना सुयोग्य असे नियोजन करावे, स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, जे क्षेत्र निवडले त्यामध्ये स्वतःला झोकून देऊन यश संपादन करावे.
याप्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पदक, प्रशस्तीपत्रक तसेच डायरी देऊन गुणगौरव व सन्मान करण्यात आला. श्री विद्या निकेतन क्लासच्या शहरात गुलमोहर रोड, वाडिया पार्क तसेच भिंगार येथे शाखा आहेत.येथे सातवी ते दहावी चे इंग्रजी व सेमी इंग्लिश माध्यमाची उत्तम तयारी करून घेतली जाते.
- Advertisement -