श्री विशाल देवस्थानच्या ऑनलाईन अथर्वशीर्ष पठणात मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या प्रशासनाच्या आवाहनानुसार मंदिरे बंद आहेत. तसेच गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरातही गणेशोत्सवानिमित्त पारंपारिक विविध कार्यक्रम प्रशासनाच्या नियमानुसार होत आहे. आजही  सामुहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. त्यास भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक भाविकांनी यात सहभागी होवून अथर्वशीर्ष पठण केले.

अथर्वशीर्ष पठण प्रसिद्ध गायिका कु.नंदिनी गायकवाड व अंजली गायकवाड आदिंसह अमृता बेडेकर, शारदा होशिंग, अवंती होशिंग आदि महिलांनी पठण केले. या ऑनलाईन फेसबुक, इस्टाग्राम व यु ट्युब द्वारे असंख्य भाविक सहभागी झाले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विजय कोथिंबीरे, ज्ञानेश्वर रासकर, गजानन ससाणे, हरिश्चंद्र गिरमे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, पांडूरंग नन्नवरे, बापूसाहेब एकाडे, भाऊसाहेब फुलसौंदर आदि उपस्थित होते.

 

अथर्वशीर्ष पठण करणार्‍याच्या भोवती कवच निर्माण करण्याची शक्ती या स्त्रोतात आहे, म्हणून अथर्वशीर्षाच्या पठणाने वाईट शक्तीच्या त्रासापासून आपले रक्षण होते. या स्त्रोत्रात फलश्रुती दिलेली असते, त्यामुळे आत्मज्ञान संपन्न व आपल्या इच्छा मनोकामना फळास येत असल्याने नियमित अथर्वशीर्ष पठण केले जाते.जो अथर्वशीर्षाचे अध्ययन – पठण करतो तो ब्रह्मस्वरुपाला प्राप्त होतो.त्याला सर्वत्र सुखप्राती होते.त्याला कोणत्याही विघ्नाची बाधा होत नाही. तो पंचमहापातकापासून मुक्त होता असतो.

 

 याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी देवस्थानच्यावतीने गणेशोत्सव काळात होणार्‍या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी शंखनाद करण्यात आला. उत्सव यशस्वीतेसाठी सर्व ट्रस्टी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!