श्री संत तुळसापुरी महाराज यांचा संजीवन सोहळा उत्साहात साजरा

0
94

जामखेड प्रतिनिधी – ( नासीर पठाण )

जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील भुतवडा गावात सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशीच्या दुसर्‍या दिवशी सोमवारी श्री संत तुळसापुरी महाराज यांची संजीवन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून बंद असलेल्या या संजीवन सोहळ्याला भुतवडा व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

भुतवडा गावात दिडशे वर्षापूर्वी गोसावी समाजाचे श्री तुळसापुरी महाराज राहत होते.घरची परिस्थिती चांगली असताना भिक्षा मागून आपली उपजीविका करून समाजात धार्मिक, सामाजिक प्रबोधन करीत असे. काही कालावधीनंतर त्यांनी जिवंत समाधी घेतली. तेव्हापासून ते आजतागायत ग्रामस्थ व भावीकभक्त हा समाधी सोहळा उत्साहात साजरा करतात.

आषाढी एकादशीच्या दुसर्‍या दिवशी संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी ग्रामस्थ, पंचक्रोशीतील व व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले सर्व जण एकत्र येतात. उत्सव सोहळयापूर्वी ग्रामस्थ गावातील हनुमान मंदिरासमोर जमतात व महाप्रसाद व इतर खर्चासाठी स्वेच्छेने वर्गणी देतात. गावागातील महिला, पुरुष, मुले एकत्र येऊन नेवैद्य तयार करतात. तुळसापुरी महाराज मंदिरापुढे भारूड, किर्तन होते.

तुळसापुरी महाराजांची प्रतिमा पालखीत बसवून वाद्यवृंदाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत गावातील सर्वजण सामील होतात. महिलांच्या डोक्यावर तुळसीवृंदावनचा कलश असतो. तुळसापुरी महाराज यांचा मानलेला अश्व अग्रभागी असतो व त्या पाठोपाठ पुरुष मंडळी मिरवनुकीत डफड्याच्या तालावर लेझीम खेळतात. गावात ज्या ठिकाणी महाराजांचे वास्तव होते त्या मार्गाने मिरवणूक जाऊन शेवटी तुळसापुरी महाराज यांच्या जिवंत समाधी मंदिर येथे येते. सर्व भाविक भक्त समाधीची विधीवत पुजा करून आरती घेतली जाते. व प्रसाद वाटप केला जातो. महाप्रसाद होण्यापूर्वी गावकरी मनोगत व्यक्त करतात.

गावचे रहिवासी व बीडचे जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके म्हणाले, श्री संत तुळसापुरी महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यासाठी वर्षानुवर्षे गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक एकत्र येतात. तुळसापुरी महाराज नाथपंथ परंपरेतील एक महान संत होऊन गेले.नाथपंथीच्या सर्वच संतानी जनतेला अध्यात्मिक ज्ञान देऊन आपले कार्य दिनदुबळ्याच्या कल्याणासाठी आपले जीवन कृतार्थ करून संजीवन समाधी घेण्याची परंपरा अबाधित ठेवली आहे. तुळसापुरी महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी गावक-यांनी पुढाकार घेतला याबद्दल आभार व्यक्त करून मंदिर परिसर सुशोभित रहावा यासाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले.

सालाबाद प्रमाणे या वर्षी तुळसापुरी महाराज यांचा भंडारा उसहव मोठया उसव्वात पार पडला सकाळी ६ वाजता महापूजानी कार्यक्रमची सुरवात झाली.नंतर गावातून पारंपरिक अशी दिंडी काढण्यात आली नंतर दिंडी गावाला प्रदक्षिणा करून दिंडी महाराजाच्या मंदिराच्या प्रांगणात पोहोचली व महाआरती करून महाप्रसादाची पंगत झाली.यावेळी मोठ्या संख्येने गावकरी व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.

यावेळी गावातील सत्यवान डोके जिल्हान्यायाधीश बीड, शिवाजी डोके, भीमराव पवार, जयसिंग डोके, महिंद्र राळेभात, अँड हर्षल डोळे, सचिन डोके, मयूर डोके, मंगेश आजबे, अनिल बाबर, गणेश डोके, राहुल डोके, बाजीरंग डोके, श्रीराम डोके, संजय डोके, संभाजी डोके, भाऊसाहेब डोके यांच्या सह सर्वच गावकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here