श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने प्रकट दिनानिमित्त बाबावाडीत मिष्ठान्न भोजन
स्वामींचा प्रगट दिन सामाजिक कार्यातून साजरा होत असल्याचे समाधान – संदिप दातरंगे
नगर – समाजातील वंचित घटकांची उन्नत्ती साधणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. श्री स्वामी समर्थांचा महिमा मोठा आहे. आज प्रगट दिनानिमित्त मुलांना मिष्ठान्न भोजन देऊन प्रतिष्ठानने सामाजिक बांधलकी जपली आहे. मुलांचे भविष्य घडविणार्या सामाजिक संस्था समाजोन्नत्तीचे काम करत आहेत, या संस्थांना छोटीशी मदत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. सण-उत्सवानिमित्त समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी मदत देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आज गरजेचे आहे. श्री स्वामी प्रतिष्ठान धार्मिक कार्याबरोबरच नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत उपक्रम राबवत असते. स्वामींचा प्रगट दिन सामाजिक उपक्रमातून साजरा होत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप दातरंगे यांनी केले.
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने प्रगट दिनानिमित्त बाबावाडी येथील मुलांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप दातरंगे, बापू ठाणगे, सनी आगरकर, विकास मुनोत, गणेश दातरंगे, पंकज दातरंगे, रविंद्र वाबळे, संकेत आगरकर, गणेश राणे आदि उपस्थित होते.
यावेळी बापू ठाणगे म्हणाले, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असतात. त्यातून समाजातील गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक दायित्व जपत आहे. आजच्या अन्नदानाच्या उपक्रमातून प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची बांधिलकी जोपसात असल्याचे सांगितले.