महाराष्ट्र राज्यात गोहत्या बंदी कायदा असून देखील नगर जिल्ह्यातील गोहत्या व तस्करीच्या प्रकरणी कारवाई होत नाही
विश्व हिंदु परिषद आक्रमक भुमिका
अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
दि.३ ऑक्टोंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील पोलिस दलाला मान खाली घालायला लावणारी व कर्तव्यात जाणीव पूर्वक हलगर्जीपणा करीत असल्याची अक्षम्य घटना.
राज्याचे महसूल मंत्री ना.थोरात यांचे राजकीय प्राबल्य असलेल्या संगमनेर तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात गोमांस साठा नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उघड होऊन जप्त करण्यात आला.तसेच संगमनेर तालुका हा मुंबई,ठाणे, पुणे इत्यादी शहरात व गोमांस पुरवण्याचे आगार असल्याचे आता लपून राहिलेले नाही.
महाराष्ट्र राज्यात गोहत्या बंदी कायदा असून देखील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस निरीक्षक हे जाणीवपूर्वक सर्वज्ञात असलेल्या कारणास्तव या प्रकरणाकडे अनेक महिन्यापासून डोळेझाक करीत असल्याचे देखील उघड झाले आहे.म्हणून या पोलिस अधिकाऱ्यांची याबाबत खातेनिहाय चौकशी करण्यात यावी.अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसार प्रमुख डाॅ.मिलिंद मोभारकर यांनी केली.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे कोषाध्यक्ष मुकुल गंधे,जिल्हा सहमंत्री गौतम कराळे,निलेश चिपाडे आदी उपस्थित होते.
याप्रकरणी चौकशी करुन पोलिस अधिकाऱ्यांवर देखील वचक निर्माण होईल अशी कारवाई होणे गरजेचे वाटते व अशी आम्ही मागणी करीत आहोत.असेच प्रकार नगर शहर,जामखेड, श्रीरामपूर,शेवगाव,कोपरगाव येथे देखील सर्रासपणे चालू असून गोहत्या व गोमांस तस्करी राजरोसपणे अव्याहतपणे सुरू आहेत व या ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून देखील अर्थपूर्ण पद्धतीने डोळेझाक होत असल्याचे नागरिकाची उघड उघड चर्चा आहे.तरी आपण या संबंधी गांभीर्याने दखल घेऊन हे सर्व प्रकार बंद होण्याच्या अनुषंगाने तातडीची योग्य ती कार्यवाही एक महिन्यात करावी अशी विनंती निवेदनात केली आहे.
याबाबत हिंदू समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत.याची नोंद घ्यावी अन्यथा हिंदू समाज या विरोधात रस्त्यावर उतरेल.असे विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्मप्रसार प्रमुख मिलिंद मोभारकर यांनी सांगितले.