संतप्त विडी कामगारांचे बागडपट्टी येथील विडी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

दिवाळीच्या तोंडावर लाल कार्डधारक विडी कामगारांना घरचा रस्ता

आर्थिक दुर्बल घटक असलेल्या लाल कार्डधारकांवर उपासमारीची वेळ

अहमदनगर प्रतिनिधी – आर्थिक दुर्बल घटकांचा समावेश असलेल्या लाल कार्डधारक विडी कामगारांना दिवाळीच्या तोंडावर रोजंदारी बंद केल्याच्या निषेधार्थ शहरातील ठाकुर सावदेकर विडी कारखान्याच्या बागडपट्टी शाखेसमोर लालबावटा विडी कामगार युनियनच्या आयटक व इंटकच्या वतीने ठिय्या आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली.

दिवाळी गोड करण्याऐवजी थेट एका नोटीसद्वारे लालकार्ड धारक विडी कामगारांना कार्यमुक्त केल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला असताना संतप्त विडी कामगारांनी विडी कारखान्या विरोधात रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात आयटकचे जिल्हा सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, विडी कामगार युनियनच्या उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, कमल दोंता, सरोजिनी दिकोंडा, निर्मला न्यालपेल्ली, लिलाबाई भारताल, शोभा पासकंटी, लक्ष्मीबाई कोटा आदींसह शहरातील विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.

पुणे येथील ठाकूर सावदेकर आणि कंपनी लिमिटेडची शहरातील बागडपट्टी येथे शाखा कार्यरत आहे. या शाखेत दि.19 ऑक्टोंबर रोजी एक नोटीस लावून लाल कार्डधारक विडी कामगारांची कामे दि.25 ऑक्टोबर पासून बंद करत असल्याचे सांगून बंद केले आहे. लाल कार्डधारकमध्ये ज्येष्ठ महिला, सेवानिवृत्त विडी कामगार व इतर गोरगरीब विडी कामगार उदरनिर्वाहासाठी काम करत आहेत.

यामध्ये 80 टक्के निवृत्त गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत. तर वीस टक्के महिलांना तीन वर्षापासून लाल कार्डवर ठेवले असून, 240 दिवस भरूनही त्यांना कायम करण्यात आलेले नाही.लाल कार्डमध्ये असलेल्या जवळपास शहरातील तीनशे विडी कामगार महिलांची रोजंदारी सदर कारखान्याने बंद केली आहे.

कोणतेही कागदपत्रे, पुरावे न देता थातूरमातूर कारणास्तव लालकार्ड बंद करण्यात आले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

सदरचे लालकार्ड बंद न करता दुरुस्त करुन कामगारांना कामे देऊन मजुरी द्यावी, विडी कामगारांना दिवाळी साजरी करण्यासाठी बोनसची रोख रक्कम द्यावी, अर्ध शिक्षित महिलांना बँकेचे व्यवहार जमत नसल्याने बोनसचे चेक शहरातील शाखेत पाठवून, ती रक्कम विडी कामगारांना रोख मिळावी, कोरोना काळात एक हजार रुपयाची दिलेली उचल टप्प्याटप्प्याने न घेता एकदम चारशे रुपये कापले असून, याची चौकशी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!