संपत दादा बारस्कर जनसेवा संघर्ष वेबसाईटचा शुभारंभ संपन्न
संपत बारस्कर यांचे वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद – आमदार संग्राम जगताप
नगर : नागरिकांचे मूलभूत प्रश्न हाती घेऊन विकासाचे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुराव्याची खरी गरज असते हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केल्यामुळे प्रभागाच्या विकास कामांसाठी मोठा निधी प्राप्त झाला असून ती कामे मार्गी लागत आहे डॉन बॉस्को परिसरामध्ये झालेल्या विकास कामांमुळे विकसित भाग म्हणून ओळखला जात आहे याचबरोबर संपत बारस्कर यांनी वृक्षारोपण व संवर्धनाचे काम सुरू करत इच्छाशक्तीच्या जोरावर नागरिकांमध्ये वृक्षाचे महत्व पटवून देत नागरिकांना दहा फूट उंचीचे मोफत आंब्याचे झाड भेट देत वृक्ष संवर्धनाची लोकचळवळ उभी केली आहे, संपत बारस्कर यांचे वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद आहे, आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत तसेच शासनाच्या विविध योजना घरापर्यंत पोहोचाव्यात यासाठी संपत दादा बारस्कर जनसेवा संघर्ष वेबसाईट सुरू केली आहे तरी नागरिकांनी या वेबसाईटचा लाभ घेत आपले प्रश्न मार्गी लावून घ्यावेत असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
चौकट :
समाजामध्ये काम करीत असताना माणुसकीचे नाते जोडण्याचे काम केले आहे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत त्यांच्यामुळेच विकासाची कामे मार्गी लागली आहेत वृक्षरोपण व संवर्धनाच्या माध्यमातून मनाला आनंद मिळत असतो यासाठी मी प्रभागातील प्रत्येक कुटुंबांना मोफत आंब्याचे झाड देत संवर्धनाची गोडी निर्माण केली आहे, डॉन बॉस्को परिसरामधील विकासाची सर्वच कामे मार्गी लावली आहेत, वेबसाईट सुरु केली असून या माध्यमातून शैक्षणिक योजना, उद्योग, व्यापार, रोजगार तसेच नागरिकांचे दैनंदिन प्रश्न सोडविले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली.
चौकट :
संपत बारस्कर यांच्या माध्यमातून डॉन बॉस्को येथे मनपाचे भव्य दिव्य मंगल कार्यालय साकारले असल्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे शुभकार्य मार्गी लागणार आहे मंगल कार्यालयाची इमारत पाहून मनाला आनंद झाला आहे, मनपा देखील अशी सुंदर वास्तू उभारू शकते ही अभिमानाची बाब आहे, हे काम संपत बारस्कर यांनी करून दाखवले आहे, विकासाची कामे मार्गी लावत असताना त्याचे योग्य नियोजन केल्यास ते काम चांगल्या प्रकारे उभे राहते असे मत आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
चौकट :
जगासमोर पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण झाली असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसत आहे, यंदा तर तापमानाने उच्चांक गाठला आहे, त्यामुळे नागरिकांना या उन्हाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे तरी आपण सर्वानी या उन्हाच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी वृक्ष संवर्धन आणि संगोपन करावे, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे काळाची गरज बनली आहे, संपत बारस्कर यांनी वृक्ष संवर्धनाही मोहीम हाती घेतली त्याचे अनुकरण सर्वानी करावे असे आवाहन माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले.