संसद बंद पाडण्याची भाषा करणारे लंके यांनी पात्रता तपासावी – धनंजय मुंडे

- Advertisement -

संसद बंद पाडण्याची भाषा करणारे लंके यांनी पात्रता तपासावी – धनंजय मुंडे

राहुरी

जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला मिळवून दिली आहे देशाचा अभिमान ज्याला असेल त्याने येत्या 13 तारखेला देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत आणि खासदार सुजय विखे व्हावेत यासाठी राष्ट्र अभिमान मनात ठेवून मतदान करावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की,अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुती व मित्र पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांची जाहीर सभा पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे होते तर यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील रावसाहेब चाचा तनपुरे उत्तमराव म्हसे नामदेव ढोकणे भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर उदयसिंह पाटील विक्रम तांबे आर आर तनपुरे तानाजी धसाळ सुनील भट्टड प्रास्ताविक सुरेश बानकर शामराव निमसे किशोर वने विक्रम तांबे प्रफुल्ल शेळके देवेंद्र लांबे यांच्यासह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की. सत्तर वर्षे ज्यांना देशाचा विकास करताना नाही हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत आहेत सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे त्या माध्यमातून त्यांनी देशाला व पत आणि प्रतिष्ठा मिळून दिली. त्यामुळेच भारत आज जगाच्या पाठीवर विश्वगुरू म्हणून नेतृत्व करत आहे याचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदी यांना आहे खासदार सुजय विखे यांनी देखील अहमदनगर चा विकास गतिमान केला आहे त्याचे अनेक उदाहरणे देता येतील ज्याला राष्ट्र अभिमान आहे त्यांनी पंतप्रधान मोदी व सुजय विखे यांना मतदान करून देशाला पुढे नेण्याचे काम करावे समोरचा उमेदवार हा बहुरूपी उमेदवार आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका अन्यथा पस्तावा काळण्याची वेळ येईल यावेळी बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, पाच वर्ष आमदार असताना त्यांना पारनेरचा विकास साधता आला नाही ते आता जिल्ह्याच्या विकासाची भाषा करत आहेत मात्र आम्ही गेली सहा वर्ष जनतेच्या बरोबर राहून जिल्ह्याचा विकास साधला आहे राहुरी तालुक्याने विखे घराण्यावर नितांत प्रेम केले आहे.

याही निवडणुकीमध्ये के प्रेम आहे तसेच राहणार आहे समोरच्या उमेदवाराला गाडण्याचे काम राहुरीचे जनता करणार आहे खासदार असताना मला विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याकडून धमकी दिली जाते तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न देखील विखे यांनी यावेळी उपस्थित केला पद्मश्री नंतर आम्ही काय काम केले असा प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांनी आमच्याबरोबर जिल्ह्यात फिरावे आम्ही काय कामे केली त्यांना ते दाखवून देऊ राहुरी तालुक्यातील अनेक प्रश्न आम्ही मिटवले प्रशासकीय इमारत ग्रामीण रुग्णालय हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिला ते मिटवण्याचे काम आम्ही केले पारनेरची जनता दहशतीखाली आहे मात्र आम्ही जिल्ह्यात हे होऊ देणार नाही टक्केवारी खाणारे कोण हे जनता जाणून आहे नगर मनमाड रोड मध्ये टक्केवारी खाऊन काम कोणी बंद पाडले हे जनता जाणून आहे मंत्री असताना देखील ग्रामीण रुग्णालय देखील उभारता आले नाही त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार काय ही निवडणूक देश हिताचे आहे त्यामुळे जनता कोणत्याही गुंडाला राजकारणात थारा देणार नाही हा विश्वास आम्हाला आहे. कारखाना बंद पाडण्याचे पाप करणारे आमच्यावर आरोप करतात हे दुर्दैव आहे.

यावेळी बोलताना शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, राहुरी तालुका एक नंबरचे लीड देईल यात शंका नाही. भाजपाच्या माध्यमातून मोठा विकास झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील व खासदार सुजय विखे हेच होतील यात शंका बाळगण्याचे कारण नाही. संसद बंद पाडण्याची भाषा करणारे लंके यांनी पात्रता तपासावी. मिरची भाकरी खाताना फोटोसेशन समोरचा उमेदवार करीत आहे. राहुरी शहराचे अनेक कामे खासदार सुजय दादा विखे पाटील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गी लावले भुयारी गटारी योजना प्रशासकीय इमारत त्यांनीच केले. कारखान्याबाबत आरोप होत आहेत मात्र तो चालू करण्यासाठी खासदार विखे व मी प्रयत्न केले. चालू केला मात्र त्याचे वाटोळे करण्याचा प्रयत्न कोणी केला कोणाच्या काळात हे घडले हे राहुरीचे जनता जाणून आहे. महावितरण च्या माध्यमातून राहुरीच्या मंत्र्याने वसुलीचे काम केले. खासदार विखे यांना पाच लाखाचा लिड मिळेल याची आम्हाला खात्री आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!