सतरा महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली.

0
83

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

सतरा महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली आणि कर्जत तालुक्यामधील सर्व शाळाचा परिसर विद्यार्थ्यांनी बहरून गेला.तालुक्यामध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची ४० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती दिसली.

कोरोनाविषाणू यांच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या १७ महिन्यांपासून सर्व शाळा महाविद्यालय बंद होते, राज्य शासनाने आज पासून शाळा सुरू करण्याचा जाहीर केले होते त्या नुसार तालुक्यातील ११४ शाळांपैकी १०५ शाळांचे कामकाज अधिकृतपणे आज सुरू झाले आहे.

तब्बल १७ महिन्यानंतर आज शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी पालक शिक्षक या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता होती, करुणा ची तिसरी लाट वर्तवण्यात येत असल्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये येतात की नाही याविषयी शंका व्यक्त करण्यात आल्या होत्य.मात्र सर्व शंका फोल ठरवत सर्व शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेला होता.

कर्जत तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असल्याचे दिसून आले.शाळांचा परिसर आणि वर्ग खोल्या विद्यार्थ्यांच्या गोंगाटाने व गजबजाट यांनी पुन्हा एकदा हा सर्व परिसर आणि शाळेच्या भिंती बोलू लागल्याचे दिसून आले.

शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले,आपले मित्र भेटल्याचा आनंद अनेकांनी विद्यार्थ्यांनी गळा भेट घेऊन साजरा केला.तर महाविद्यालयांमधील विद्यार्थी मित्रांच्या आणि मैत्रिणीच्या सोबत सेल्फी काढताना दिसून आले.

कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय येथील प्राचार्य श्री मापारी व सौ सोनाबाई नामदेव सोनमाळी कन्या विद्या मंदिर येथील मुख्याध्यापिका श्रीमती केदारी यांनी यावेळी पत्रकारांना माहिती दिली की, शाळा सुरु होणार असल्यामुळे सर्वांमध्येच मोठी उत्सुकता होती.आम्ही देखील सर्व तयारी पूर्ण केलेली आहे.शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे अंमलबजावणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी व्यवस्था याशिवाय सेनीटायझर तसेच सर्व वर्ग स्वच्छ करण्यात आले होते. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्यात आले आहेत. शाळांच्या वेळा या शिफ्ट नुसार करण्यात आल्या आहेत.अशा पद्धतीने सुरक्षेचे सर्व नियम पाळून शाळा भरविण्यात आल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी देखील मोठी उपस्थिती दाखवली आहे.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळेमध्ये आल्यामुळे एक वेगळे समाधान पहावयास मिळाले.

 

गटशिक्षण अधिकारी मिनाक्षी शिवगुंडे

शासनाच्या नियमाप्रमाणे कर्जत तालुक्यामध्ये ग्रामीण भागांमध्ये इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागांमध्ये आठवी ते बारावी असे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तालुक्यामध्ये एकूण ११४ जिल्हा परिषद, खाजगी व विनाअनुदानित शाळा आहेत.यापैकी १०५ शाळा आज सुरू झाल्या आहेत या सर्व शाळांमधील एकूण विद्यार्थ्यांची संख्या २४ हजार ६०४ असून यामध्ये दहा हजार ८८२ विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here