सपोनि विनोद चव्हाण यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सपोनि विनोद चव्हाण यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती

नगर :जिल्ह्यात पोलिस दलात खमक्या अधिकारी म्हणून कारर्किद गाजविलेले आणि सध्या सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. त्यांच्या पसंतीप्रमाणे त्यांना गडचिरोली येथे नियुक्ती मिळाली. त्यामुळे त्याचे नगर व बीड जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

पोलिस निरीक्षक विनोद दिलीप चव्हाण (मु. पो. डोंगरगण, ता. आष्टी. जि. बीड) यांची   महाराष्ट्र लोकसेवा आयोगद्वारे 2010 मध्ये पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) पदी निवड झाली होती. नाशिक येथे मुख्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 2011 ते 2014 पर्यंत त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षल विरोधी पथक – 60 कमांडो मध्ये काम केले. गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची सहायक पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती झाली. त्यांना नगर जिल्ह्यातील नगर तालुका पोलिस ठाणे मिळाले. तत्कालीन पोलिस अधीक्षक लखमी गौतम, रंजन कुमार शर्मा, सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उत्कृष्ट काम केले. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाणे, कोतवाली पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. या कार्यकाळात त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली. तर अनेक गरजूंना न्याय मिळून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

2019 मध्ये नगरमधून त्यांची यवतमाळ येथे बदली झाली. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा, पारवा पोलिस ठाणे (प्रभारी अधिकारी) व पोलिस अधीक्षक कार्यालय येथे सचोटीने कामकाज केले. मार्च 2024 मध्ये त्यांची सोलापूर आयुक्तालय येथे बदली झाली. सध्या ते विजापूर नाका पोलिस ठाणे येथे कार्यरत आहेत. 10 जून 2024 रोजी पोलिस विभागमार्फत काढलेले आदेशात त्यांना पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यांच्या पसंतीप्रमाणे त्यांची गडचिरोली जिल्यात बदली झाली आहे. गडचिरोलीमधील नोकरी ही पोलिस दलातील सर्वात कठीण कार्यकाळ मानला जातो. परंतु, देशसेवा करिता विनोद चव्हाण यांनी कायम गडचिरोली येथे नोकरीस पसंती देणे स्वीकारले आहे. पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याचे त्यांचे मित्र, नातेवाईक, सहकारी अधिकारी व वरिष्ठ अधिकार्‍यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!