अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 112 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
सभासदांच्या ठेवीवर ८% व्याज देणार – चेअरमन किशोर कानडे
नगर : अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 112 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन किशोर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे. यावेळी वाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे,तज्ञ संचालक जितेंद्र सारसर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, सतीश ताठे, विकास गीते, शेखर देशपांडे, बलराज गायकवाड, अजय कांबळे, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, कैलास चावरे, गुलाब गाडे, बाळासाहेब गंगेकर, संचलिका प्रमिलाताई पवार, उषाताई वैराळ, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी, अकाउंट संतोष गवळी आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चेअरमन किशोर कानडे म्हणाले की, अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेला 112 वर्षाची मोठी परंपरा असून सभासदाच्या कायम ठेवलेल्या ठेवीवर ८% व्याज देण्यात येणार आहे. याचबरोबर सभासदांना 12 टक्के डिव्हिडंड वाटप केले जाणार आहे. संचालक मंडळाच्या वतीने पतसंस्थेचा पारदर्शी कारभार करत असल्यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी ऑडिट वर्ग “अ” मिळाला आहे. तसेच पतसंस्थेला ३ कोटी 37 लाख १३ हजार ९८० रुपये एवढा ढोबळ नफा झाला आहे. सभासदाच्या आजारपणासाठी 25 हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते. तसेच सभासदाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो आणि मनपा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जातो, सभासदाच्या जोरावर मनपा पतसंस्था यशस्वी वाटचाल करीत असून पतसंस्थेच्या माध्यमातून पुढील काळामध्ये सभासदांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जरूपी आर्थिक मदत केली जाणार, असल्याचे प्रतिपादन चेअरमन किशोर कानडे यांनी केले.
मनपा पतसंस्थेचे कार्यलक्ष्मी संचालक आनंद तिवारी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले, व सभासदाने एकमुखाने पाठिंबा देत सर्व विषयांना मंजुरी दिली तर व्हाईट चेअरमन सोमनाथ सोनवणे यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.