समाजामध्ये काहीजण पैसा मिळावा म्हणून देवाची भक्ती करत असतात –  ह.भ.प.बापू महाराज लोंढे

- Advertisement -

नालेगाव गाडगीळ पटांगण येथे  हनुमान जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने ह.भ.प.बापू महाराज लोंढे यांचे कीर्तन संपन्न.

समाजामध्ये काहीजण पैसा मिळावा म्हणून देवाची भक्ती करत असतात –  ह.भ.प.बापू महाराज लोंढे

नगर :  भगवंताचे नाम चिंतन केल्यावर कुठलेही संकट मनुष्यावर येत नाही वाल्या-कोळ्याचा उद्धार झाला तो फक्त नाम चिंतनाने. आपण जे काम करत असतो त्या कामाच्या वेळी देखील भगवंताचे नाव घेऊ शकतो. आपल्या कामात देखील परमेश्वर असतो. आपल्याबरोबर संपत्ती येणार नाही तर आपण समाजामध्ये केलेल्या चांगल्या कामाची पावती बरोबर येणार आहे. आपण समाजामध्ये वावरत असताना आपला मार्ग चुकला की धोका निर्माण होत असतो. समाजामध्ये काहीजण पैसा मिळावा म्हणून देवाची भक्ती करत असतात या भक्तीचा काही उपयोग नाही.तर अंतकरणापासून देवाची भक्ती करा.समाजामध्ये काम करीत असताना अहंकार बाजूला ठेवून काम करावे. असे प्रतिपादन ह.भ.प.बापू महाराज लोंढे यांनी केले.
नालेगाव गाडगीळ पटांगण येथे  हनुमान जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने ह.भ.प. बापू महाराज लोंढे यांचे कीर्तन संपन्न यावेळी नालेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!