समृध्दी अकॅडमीचे उदघाटन
अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
कोरोनाच्या काळात शाळा दोन वर्षापासून बंद असल्याने मुलांना शिक्षणात खूप अडचणी आल्या आहेत.सर्व शाळा व क्लासेस ऑनलाइन पद्धतीने सुरू होते.त्यामुळे मुलांना इंग्रजी विषय समजून घ्यायला खूप अडचणी येत होत्या.परंतु आता समृद्धी अकॅडमीने मुलांसाठी इंग्रजी या विषयांचा क्लास घेऊन मुलांसाठी इंग्रजीचे शिक्षण सोपे केले आहे.विशेषता या क्लासेस मध्ये बेसिक इंग्रजी व व्याकरण मध्ये भर दिल्याने मुलांची इंग्रजी माध्यमासाठी खास तयारी करून घेतली जाते.विद्यार्थ्यांनी समृध्दी अकॅडमीच्या इंग्रजी क्लासचा फायदा घ्यावा.असे प्रतिपादन महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे यांनी केले.
भुतकरवाडी,महेश कॉलनी, सावेडी,अहमदनगर येथे समृद्धी अकॅडमीचे उद्घाटन महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे व माजी महिला बालकल्याण सभापती डॉ.योगिता सत्रे,प्रा. स्वाती सुडके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
प्रारंभी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी समृद्धी अकॅडमी च्या संचालिका स्वाती डोमकावळे,प्रशिक्षका योगिता देवळालीकर, सिंधू डोमकावळे,कविता चव्हाण,पूजा शिंदे,सोनाली मोरे,वैष्णवी मेढे आदी उपस्थित होत्या.
योगिता सत्रे म्हणाले की,सावेडी उपनगरातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी क्लासचे सुविधा अत्यंत महत्त्वाची होती.या भागातील मुलांना क्लासला येणे जाणे सोपे होईल.
प्रा.स्वाती सुडके म्हणाल्या की,आॅनलाईन क्लासेस मुळे मुलांना इंग्रजी शिकणे अवघड जात होते. आता ऑफलाईन क्लास सुरू झाल्याने त्यांना इंग्रजी शिकणे सोपे जाईल.तसेच समृद्धी अकॅडमीच्या इंग्रजी विषय शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे.
प्रास्तविकात स्वाती डोमकावळे म्हणाल्या की,एक डिसेंबरला क्लासेस चालू होणार आहे.समृद्धी अकॅडमी मध्ये पहिली ते दहावी इंग्लिश,सेमी इंग्लिश,मराठी क्लासेस घेतले जातील.
समृद्धी अकडमी मध्ये स्ट्रॉबेरी लिटिल स्टार नर्सरी प्ले ग्रुप लवकर चालू होईल.समृद्धी क्लासेस मध्ये विशेषतः इंग्लिश ग्रामर शिक्षण पहिली ते दहावी “स्पेशल बेसिक ग्रामर अॅंड ऍडव्हान्स ग्रामर” आठवड्यातून सोमवार व बुधवार शिकवले जाईल.लहान मुलांना सहज सोपे जाईल अशा पद्धतीने इंग्रजी व्याकरण बेसिक इंग्रजी शिकवले जाईल.
कार्यक्रमाचे सुञसंचालन योगिता देवळालीकर यांनी केले.तर स्वाती डोमकावळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी रेणुका देवळालीकर, ऋतिक मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.अधिक माहितीसाठी मो.नं 9096294569,9579301045संपर्क साधावा.