सरपंच परिषदेची सरकारकडे गुंड कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विजेच्या धक्क्याने विद्यमान सरपंचाचे निधन नगर जिल्ह्यातील घटना

 

संगमनेर प्रतिनिधी :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पिंपळगाव देपा गावचे विद्यमान सरपंच प्रदिप गुंड यांचे गुरूवारी दि.१४/०७/२०२२ रोजी सकाळी ७.०० सुमारास घरात विजेचा धक्का लागून दुर्दैवी निधन झाले. मृत्यू समयी ते अवघे ३० वर्षाचे होते.त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबबात माहिती अशी की,सरपंच प्रदिप गुंड हे नेहमी प्रमाणे सकाळी आपले कामकाज करत असतांना अचानक त्यांना घरातील वीजेच्या उपकरणाचा वीज प्रवाह जास्त असल्याने जोराचा धक्का बसला.त्यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी,एक मुलगा असा परिवार आहे.सरपंच म्हणून त्यांनी गावात मोठे काम उभारले असून त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

आर्थिक मदतीसाठी सरकारकडे मागणी करणार – दत्ताभाऊ काकडे

सरपंच हा गावचा प्रमुख असतो प्रत्येकाच्या सुख दुखत तो बरोबर असतो मात्र काही प्रसंग वाईट येतात गावाला कुटूंब म्हणून काम करणाऱ्या सरपंचा च्या कुटूंबावर वेळ आल्यावर त्याना सर्वांनी मदत केली पाहिजे.पिपंळगावं देपा गावचे सरपंच प्रदीप गुंड हे तरुण सरपंच होते.त्यांच्या निधनाने गावची आणि सरपंच परिषदेची हानी झाली आहे.आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गुंड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी करणार आसल्याचे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!