जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण
दिवाळीत मोठी माळ, रस्सी बॉम्ब आणि धूर सोडणारे फटाके फोडणे टाळा. फटाक्यांच्या आतषबाजीनं उत्साह निर्माण होत असला तरी, ते आजार पसरवणारेही आहेत, हे लक्षात ठेवावे. आकाशात सोडलेले फटाके फुटल्यानंतर त्यातील सेंद्रिय संयुगे हवेत मिसळतात. ते प्राणघातक ठरू शकते.अस्थमाच्या रुग्णांनाच नव्हे, तर इतरांनाही यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेले फटाके फोडू नयेत असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेले फटाके फोडून प्रदुषण करू नये म्हणून आज पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी खर्डा चौक, बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय यासाठी पत्रकारांसोबत जनजागृती केली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, सुदाम वराट, अविनाश बोधले, विनायक जोशी, पप्पू सय्यद, धनराज पवार, जाकीर शेख पोलिस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे, आजीनाथ जाधव, दिनेश गंगे, हेड कॉन्स्टेबल भगवानराव पालवे, होमगार्ड रफिक तांबोळी, विजय घोडके यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.
यावेळी जनजागृती करताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की, दिवाळीत माळचे, रस्सी बॉम्ब आणि धूर सोडणारे फटाके जास्त आवाज होणारे फटाके फोडणे टाळा. फटाक्यांच्या आतषबाजीनं उत्साह निर्माण होत असला तरी, ते आजार पसरवणारेही आहेत, हे लक्षात ठेवावे.आकाशात सोडलेले फटाके फुटल्यानंतर त्यातील सेंद्रिय संयुगे हवेत मिसळतात.ते प्राणघातक ठरू शकतात शाळा, महाविद्यालये, दवाखाने, वृद्धाश्रम याठिकाणी तर कसलेही फटाके फोडू नयेत असेही सांगितले
यावेळी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ म्हणाले की, फटाक्यांमुळे अस्थमाच्या रुग्णांनाच नव्हे, तर इतरांनाही श्वसनाचा त्रास होऊ शकतो. मोठ्या आवाजामुळे लहान मुलांच्या कानाचे पडदे तुटतात वृद्धानाही त्रासदायक होतात असे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले की, जैन धर्मामध्ये तर फटाके फोडणे सुरूवातीपासूनच निषिद्ध मानले आहे.
यावेळी लोकांना आवाहन करताना पत्रकार सुदाम वराट यांनी सांगितले की, फटाक्यांमुळे वायू,ध्वनी प्रदुषण मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे सजीव प्राणी मात्रांचा मोठा त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आपण सर्वांनी पालन करून प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूयात.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण म्हणाले की पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड साहेब प्रदुषण मुक्त दिवाळी या विषयावर जनजागृतीचे काम करतात त्याची अमंलबजावणी सर्वानी तंतोतंत करावी .