सर्व पंथीय ख्रिस्ती समाजातील विविध प्रश्‍न चर्चेद्वारे सोडविण्याकरिता एकजुटीचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंथ सारे विसरून जाऊ, ख्रिस्ती सारे एक होवू!! हे ब्रीद स्वीकारुन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेच्या माध्यमातून सर्व पंथीय ऐक्य आणि त्याबरोबर समाजाचा विकास हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. मात्र त्यासाठी ख्रिस्ती समाजाचे संघटन मजबूत होणे गरजेचे आहे. तरच समाजाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचा विश्‍वास महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी व्यक्त केला.
अनिल भोसले हे अहमदनगर दौर्‍यावर आले असता, युनियन ट्रेनिंग कॉलेज मध्ये सर्व ख्रिस्ती पंथीयांच्या झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीस ख्रिस्ती विकास परिषदेचे माध्यम सल्लागार प्रमुख सॉलोमन गायकवाड, परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा जयमाला पवार, शहराध्यक्ष अमोल लोंढे, सुनील वाघमारे, मेरी वंजारे, सुषमा मकासरे, नीता सोनवणे, सुमन कांबळे, सत्यशील शिंदे, कमलाकर भोसले, नीलेश वाकचौरे, संजय सगळगीळे, प्रभाकर काळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

भोसले पुढे म्हणाले की, ख्रिस्ती समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व राजकीय क्षेत्रातील सद्यस्थिती बाबत आपण जागृत होऊन ज्वलंत प्रश्‍नावर आवाज उठवायला हवा. सर्वाची एकजुट होणे ही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध शासकीय योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली.

सॉलोमन गायकवाड म्हणाले की, आज समाजाची होत असलेली हेळसांड दुर्देवी आहे. आता योग्य नियोजन केले नाही, तर भावी काळात समाजाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे समाजाची अधोगती रोखून प्रगतीकडे वाटचाल होणे गरजेचे आहे. ख्रिस्ती म्हणविणार्यांनी आता याचा विचार करायला हवा. जात पडताळणी, ओबीसी दाखले मिळण्यासंदर्भातील येणार्या अडचणीबरोबरच धर्म व जातीची झालेली गल्लत यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या ज्वलंत प्रश्‍नावर संघटनात्मक सर्वांगीण प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!