सविता रमेश फिरोदिया प्रशालेकडून मानवसेवा व सावली संस्थेस भेटवस्तू

0
92

सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न – दिलीप गुंदेचा

अहमदनगर प्रतिनिधी – आपल्या आनंदी क्षणात समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांनाही सामावून घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांचे दु:ख कमी होऊन आपलाही आनंद द्विगुणित होत असतो. शालेय विद्यार्थ्यांना याच सामाजिक दायित्वाची जाणिव व्हावी, यासाठी शाळेच्यावतीने दिपावलीनिमित्त सामाजिक संस्थोतील मुलांना मदतीचा हात दिला आहे. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्याना समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न संस्थेच्यावतीने केला जात आहे. दिवाळी सर्वांसाठी आनंदाचा सण, त्यात मुलांसाठी ही एक पर्वणी असते. परंतु वंचित मुलांचीही दिवाळी आनंदी होण्यासाठी संस्थेने हा उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन शिशू संगोपन संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा यांनी केले.

सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून दिपावली भेट उपक्रमांतर्गत अमृत वाहिनी मानवसेवा प्रकल्प व केडगांव येथील सावली संस्थेस भेट वस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, विश्वस्त एल.के.आव्हाड, मुख्याध्यापिका योगिता गांधी, मानवसेवाचे शेख सिराज, अनिल दुधावडे, सावलीचे नितेश बनसोडे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी उपाध्यक्ष दशरथ खोसे म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. दिवाळी सणाचे महत्व आणि इतरांच्या आनंदात आपला आनंद मानुन दुर्लक्षित घटकांचीही दिवाळी गोड करण्याची शिकवण या उपक्रमात विद्यार्थ्यांना दिली असल्याचे सांगितले.

प्रास्तविकात मुख्याध्यापिका योगिता गांधी म्हणाल्या, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच समाज सेवेची शिकवण देण्यासाठी मदतीचा उपक्रम राबविला आहे. आपण जसा दिवाळी सण आनंदात साजरा करतो, तसाच वंचित मुलांनाही साजरा करता यावा यासाठी हा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाल्याचे सांगितले.

यावेळी शेख रिराज व सावली नितेश बनसोडे यांनी आपआपल्या संस्थेबद्दल माहिती देऊन आमच्या संस्थेतील मुलांची दिवाळी आनंदी व प्रकाशमय करण्यासाठी दिलेली मदत ही उत्साहवर्धक असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here