सहा विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत श्रीराम विद्यालयाचे उत्तुंग यश


सहा विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थाद्वारा आयोजित जिल्हास्तरीय ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत नगर तालुक्यातील श्रीराम विदयालय राळेगण या विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. तर जिल्हा गुणवत्ता यादीत सर्वाधिक शिष्यवृती धारकामध्ये विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

संस्थेचे अध्यक्ष रा.ह. दरे यांच्या मातोश्री कै.भिवराबाई दरे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या गुणवंतांना रोख स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. स्कॉलरशिपच्या धर्तीवर परीक्षेचे स्वरूप असून 300 गुणांची ही परीक्षा सहावी व सातवी या वर्गासाठी घेतली जाते. विद्यालयाचे सहावीतील गुणवत्ताधारक – पूर्वा ज्ञानेश्‍वर कोतकर (तृतीय क्रमांक), समृद्धी अर्जून खराडे (चतुर्थ क्रमांक), अविष्कार प्रशांत दुरेकर (पाचवा क्रमांक); सातवीतील गुणवत्ता धारक – श्रेयशी सुधीर भापकर, तेजस्विनी मारुती पिंपळे व कृष्णा राजेश पिंपळे (सर्व पाचवा क्रमांक) यांनी यश प्राप्त केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना राजश्री जाधव, राजेंद्र कोतकर, हरीभाऊ दरेकर, संजय भापकर, सुजय झेंडे, मनवरे सर यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका तारका भापकर व ज्येष्ठ शिक्षक विजय जाधव यांचे विशेष योगदान लाभले. विद्यालयाचा निकाल इयत्ता सहावी 92 टक्के व सातवीचा निकाल 94 टक्के लागला आहे.

शिष्यवृत्तीधारक सर्व गुणवंतांचे संस्थेचे अध्यक्ष रा.ह. दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्‍वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, माजी सचिव जी.डी. खानदेशे, विश्‍वस्त मुकेशदादा मुळे, सितारामजी खिलारी, अरुणा काळे, संस्था निरीक्षक पी.एस. गोरे, सरपंच दिपाली सुधीर भापकर, उपसरपंच कल्पना कैलास कुलांगे, मुख्याध्यापिका तारका भापकर, शरद कोतकर, मारूती पिंपळे, किरण भापकर, भरत हराळ, संतोष हराळ, राहुल साळवे, निळकंठ मुळे, अरविंद कुमावत, रामदास साबळे, विशाल मुळे, आकांक्षा शेलार, विशाल शेलार आदींसह ग्रामपंचायत सेवा सोसायटी पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!