‘साईरंग 2.0’ आय.डी.ए. अहमदनगर

- Advertisement -

‘साईरंग 2.0’ आय.डी.ए. अहमदनगर

दंत वैद्यकीय शाखेतर्फे आयोजित राज्यस्तरीय दंत परिषद संपन्न

आधुनिक तंत्रज्ञान काळाची गरज, दंतवैद्यकीय शाखेच्या विकासासाठी पुर्ण प्रयत्नशील राहणार – अध्यक्ष डॉ.मनिषा कुलकर्णी

‘‘ सर्व महिला पदाधिकार्‍यांच्या मदतीने राज्यस्तरीय दंतपरिषद महिला प्रमुख पाहुणे डॉ. सबिता राम यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी ’’- सचिव डॉ. नेहा जाजू (इंडियन डेंटल असोसिएशन अहमदनगर)

नगर – दंतवैद्यकीय शाखा नेहमी नवनविन तंत्रज्ञान व आधुनिक उपचार पद्धतीचा खुप सौहार्दपूर्ण स्वीकार करताना दिसुन येते. अहमदनगरच्या डेंटल असोशिएशनच्या माध्यमातून या बदलांचा लाभ सर्व डॉक्टरांना मिळवून देण्यासाठी ‘साईरंग 2.0 परिषदेच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वापर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या दंतपरिषदेत करण्यात आला.

राज्यस्तरीय परिषदेच्या माध्यमातून विचारांची देवाण घेवाण होऊन संघटनात्मक कार्यावर भार देण्यात आला. नवनवीन उपचार पध्दतीचा उपयोग करून रुग्णांना दिलासा देण्यासाठी अशा परिषदेचा बहुमोल उपयोग होत आहे. सर्व सदस्यांच्या सहकार्याने विविध उपक्रमातून ही राज्यस्तरीय परिषद यशस्वी झाली असल्याची माहिती डॉ. मनिषा कुलकर्णी यांनी सांगितली.

इंडियन डेंटल असोशिएशनच्या वतीने साईरंग 2.0 या राज्यस्तरीय परिषदेचे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सबिता राम, डॉ. हेमंत उमरजी, परिषदेचे राज्यस्तरीय सचिव डॉ. विकास पाटील, राज्यस्तरीय अध्यक्ष डॉ. विष्णुदास भंडारी, डॉ. अजित कदम, अध्यक्षा डॉ. मनिषा कुलकर्णी, सचिव डॉ. नेहा जाजू, डॉ राजलक्ष्मी राय, खजिनदार डॉ. रूपल माचवे, सह-खजिनदार डॉ. पल्लवी चेडे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ संतोष दिक्षित यांनी बेसिक इंम्लॉटॉलॉजी या विषयावर तसेच डॉ. चंद्रकांत सारंगकर यांनी रोटरी एन्डोडोन्टीक्स या विषयावर मार्गदर्शन तसेच कार्यशाळा घेतली या कार्यशाळेसाठी जवळपास 32 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या परिषदेच्या निमित्ताने ‘‘ डेंटीनोवो ’’ या मॅग्झीन चे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्व सदस्यांना मॅग्झीनच्या निमित्ताने विविध कलादर्शन तसेच अत्याधुनिक उपचार वापरून पूर्ण केलेल्या रुग्णांच्या केसेस सादर करावयास विचारपीठ मिळाले. या मॅग्जीनचे संपादक डॉ. अमृता देडगावकर यांचे मोलाचे योगदान लाभले. दंतवैद्यकीय शाखेत शिकत असणार्‍या विद्यार्थांसाठी पेपर व पोस्टर प्रेसेंटेशन घेण्यात आले व उल्लेखनीय पेपर व पोस्टरर्स ना पारितोषिकाने सन्मानित ही करण्यात आले. डॉ. शैल जग्गी, डॉ. लिशा जैन, डॉ. शरद शेट्टी, डॉ. निरंजन वटकर, डॉ हेमंत उमरजी आणि डॉ.रुचिका सुद या तज्ञ व्यक्तिचें मार्गदर्शन सर्व सभासदांना लाभले.

‘या सर्व अभ्यासपूर्ण विचारमंथनाने सभागृह भारावुन गेले.’ सर्व लहान मुले व डेंटिस्टेतर मंडळींसाठी ‘गोष्टरंग’ या खास व आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या परिषेदेसाठी डॉ. प्राची पाटील, डॉ. अरुणा भंडारी, डॉ. फातिमा शेख, डॉ. अविनाश वारे, डॉ. चंद्रकांत डुंगरवाल, डॉ. दत्तात्रय पंडित, डॉ. भाऊसाहेब लांडे, डॉ. संजय खेडकर, डॉ. अभिजित मिसाळ, डॉ. वैशाली पाटील, डॉ. सोनिया औटी, डॉ. मुस्कान तलरेजा, डॉ ओंकार कुलकर्णी, डॉ. विनोद मोरे, डॉ. विवेकानंद चेडे, डॉ. कृष्णा जाजु, डॉ. अशोक कोल्हे, डॉ. गुरुप्रसाद हंडाळ, डॉ. योगीराज वीरकर, डॉ. निलकंठ म्हस्के, डॉ. आशिष रोराळे, डॉ. अभिजित होशिंग, डॉ. प्रतिक वैरागर, डॉ. सुमित नलवडे, डॉ. विजय सोनवने, डॉ. नितिश इंगळे, डॉ. अक्षता हंडाळ, यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

डॉ. दिपाली काशीद, डॉ. प्राची पंडीत, डॉ. प्राजक्ता सावेडकर, डॉ. धनश्री अबुज, डॉ. रुतुजा फिरोदिया यांच्या प्रभावी सुत्रसंचालनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच ज्यांच्या शिवाया हा परिषदेचा गोवर्धन उचलूच शकला नसता असे डॉ. शिल्पा इनमुलवार, डॉ. सोनम मुथीयान, डॉ.अक्षता हंडाळ, डॉ. पायल धुत, डॉ. सौरभ पंडीत, डॉ. पुनम मुळे, डॉ. अभिषेक मुळे, डॉ. योगेश सोनवणे, डॉ. ओंकार भालसिंग, डॉ. प्रिया भालसिंग, डॉ. प्राजक्ता झावरे, डॉ.पुजा गायकवाड, आदी मंडळीनी मोलाचे सहाकार्य दिले.

डॉ. संजिवनी जरे, डॉ. वर्षा शिंदे, डॉ. किर्ती कोल्हे, डॉ. दिपाली गव्हाणे, डॉ. रेयाली गजरे, डॉ.अमृता देडगावकर, डॉ. कुणाल कोल्हे, डॉ. ऋतुजा फिरोदिया, डॉ. रुचि अट्टल, डॉ. मयुरी शिंदे, डॉ. विश्‍वजीत देशमुख, डॉ. प्राचि चुडीवाल, डॉ. मोनाली बोर्‍हाडे, डॉ. अश्‍लेषा सोनवणे, डॉ. प्रतिक अट्टल , डॉ. प्राचि इंगळे, डॉ. किरण माचवे, डॉ. अंकुश अनारसे, डॉ. संदिप पवार, डॉ. सलमान शेख, डॉ. प्रमोद निकरड, डॉ. अतुल मडावी, डॉ. ममता डुंगरवाल, डॉ. किरण सेठीया, डॉ. स्वाती चंगेडीया, डॉ. दिपक वैद्य, डॉ. सागर शिंदे, डॉ. अमृता अनारसे, डॉ. हर्षा गांधी, डॉ. रोहन बनसोडे, या मंडळींची ही महत्वपुर्ण योगदान परिषदेसाठी लाभले.

कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना डॉ. अविनाश वारे म्हणाले- ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो तसेच प्रत्येक यशस्वी स्त्रीमागेही एका पुरुषाची खंबीर साथ असते.‘ त्याप्रसंगी डॉ. मंगेश कुलकर्णी व डॉ कृष्णा जाजु यांचा प्रमुख पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानुन सचिव डॉ.नेहा जाजूनी कार्यक्रमाची सांगता केली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles