साई मिडास परवानगी हेराफेरी प्रकरणात आमदार बच्चू कडू यांनी केली रीतसर गुन्हे दाखल करण्याची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

साई मिडास परवानगी हेराफेरी प्रकरणात आमदार बच्चू कडू यांनी केली रीतसर गुन्हे दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) : झोपडी कॅन्टीन रस्त्यावरील दूध संघाच्या जागेवर साई मिडास बिल्डरने बांधलेल्या बिल्डिंगला घेतलेली बांधकाम परवानगी ही पूर्णपणे बोगस असून ही परवानगी घेताना हेराफेरी करण्यात आली. त्याची कागदपत्रे दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी पालिकेला याप्रकरणी संबंधित बिल्डरवर आणि आर्किटेक्टवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे. तसेच त्यांची परवानगी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावी असे त्यांनी म्हटले आहे.

 

या बांधकामाची परवानगी घेण्यासाठी पालिकेकडे पाच कोटी रुपये भरल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करण्यात आले आणि परवानगी घेण्यात आली. याविषयी काँग्रेस प्रदेश सचिव दिप चव्हाण यांनी माहिती अधिकारात कागदपत्रे मागितली. ज्येष्ठ विधिज्ञ अभिजीत पुप्पाल यांच्यामार्फत पालिकेकडे तक्रार केली. आमदार बच्चू कडू यांच्याशी देखील संपर्क साधला. त्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारू असे सांगितले. त्यानंतर पालिकेला नोटीस पाठवली.  पालिकेने यावर खुलासा केला. बिल्डरने बोगसपणा केला आहे हे त्यांनी मान्य केले. पण कोणतीच कारवाई केली नाही. बच्चू कडू आणि दीप चव्हाण यांना थातूरमातूर खुलासा दिला. त्यावर ते भडकले. आणि त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

त्यांनी म्हटले आहे की मनपा कार्यक्षेत्रातील टीपी स्कीम नंबर चार मधील फायनल प्लॉट 44 वर साईमिडास या कंपनीने बांधकाम पूर्ण तू दाखला घेताना पाच कोटी रुपये फी भरणा केल्याचा खोटं प्रमाणपत्र दिलं. ही बाब पालिकेच्या ध्यानात आली. पालिकेने त्यांना  कंप्लिशन  सर्टिफिकेट दिले होते. त्याने पालिकेला फसवले हे सिद्ध करण्याची गरज नसतानाही पालिकेने 20 मे रोजी बिल्डरला वाचवण्यासाठी खुलासा नोटीस पाठवली. ही नोटीस वाचल्यानंतर असं लक्षात येतं की चोर चोरी करून गेला आणि त्या चोरांनी सोडलेले रक्कम आणून दिली म्हणून या चोराला सोडून द्या अशा पद्धतीने तुमचं काम दिसत असून आपण बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कडू यांनी केला आहे.

 

आम्ही दिव्यांगांच्या मागण्या घेऊन शासकीय कार्यात आलो तर आमच्यावर गुन्हे दाखल करता आणि जे बिल्डर लोक महानगरपालिकेत खोटं प्रमाणपत्र देऊन पाच कोटी रुपयांची फसवणूक करतात त्यांना तुम्ही वाचवता. ही विषम कार्यपद्धती मोघली कार्यपद्धतीची आठवण करून देणारी आहे. असे ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!