सागरा प्राण तळमळला! नाटकाच्या प्रयोगास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

हर घर सावरकर अभियानातंर्गत शिवसेना-भाजप युतीचा उपक्रम

सावरकरांची ज्वाजल्य देशभक्ती व स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाच्या नाटकातील क्षणांनी प्रेक्षक भारावले

अहमदनगर प्रतिनिधी- हर घर सावरकर अभियानातंर्गत  शिवसेना-भाजप युतीच्या वतीने शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात घेण्यात आलेल्या सागरा प्राण तळमळला या नाटकाच्या प्रयोगास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ज्वाजल्य देशभक्ती व स्वातंत्र्यासाठी असलेल्या त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.

नाटकाचे प्रारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री नानासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, बाबुशेठ टायरवाले, संपर्क प्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे सचिन पारखी, सुवेंद्र गांधी, माजी महापौर शिलाताई शिंदे, दत्ता गाडळकर, बंटी ढापसे, प्रल्हाद जोशी, ओंकार शिंदे, विशाल शितोळे, युवा सेनेचे आकाश कातोरे, योगेश गलांडे, महेश लोंढे, मयुर गायकवाड, रणजीत परदेशी, पोपट पाथरे, सुनिल लालबोंद्रे, अमोल हुंबे आदींसह शिवसेना, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी हर घर सावरकर अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत हिंदू तेज सूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सागरा प्राण तळमळला या नाटकाचे प्रयोग पूर्ण राज्यात होत असून, शहरात हा अकरावा प्रयोग नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आला होता.
श्री श्री बालाजी निर्मित व मधुसूदन कालेलकर लिखित सागरा प्राण तळमळला या नाटकात स्वातंत्र्य वीर सावरकरांचे हिंदुत्व व त्यांनी देशासाठी केलेला त्याग व केलेले महान कार्याचा इतिहास नागरिकांपुढे जीवंत करण्यात आला. सावरकरांचे अखंड हिंदुस्तानचे स्वप्न, स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी केलेला त्याग, कुटुंबापेक्षा राष्ट्राला समर्पित होऊन सहन केलेल्या हाल-अपेष्टा, ब्रिटिशांच्या मनात सावरकरांच्या देशभक्तीची भरलेली धडकी आदी क्षणांनी भरलेले व अक्षरश: अंगावर शहारे आणणारे नाटकाच्या सादरीकरण झाले. प्रेक्षकांनी नाटकातील विविध क्षणांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद देऊन स्वातंत्र्य वीर सावरकरांचा जयघोष केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!