आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेत घेतला साथीच्या आजारांवर उपाययोजनांचा आढावा
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
शहर आणि उपनगरांमध्ये डेंगू. मलेरिया. चिकनगुनिया सह साथीच्या आजारांच्या वेगाने फैलाव होत असून. त्याच बाबत तातडीने उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना आमदार संग्राम जगताप यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार किटकजन्य आजारांचा विरोधात शहरात फाईट टु बाईट अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली आहे.
शहर आणि उपनगरांमध्ये डेंग्यू ,चिकुनगुनिया, मलेरिया, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासंदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी मंगळवारी मनपा आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन उपाययोजना बाबत सविस्तर चर्चा करत विविध सूचना केल्या. शहरात साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया आजारात रुग्णांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. त्यामुळे गोरगरीब रुग्ण घाबरून जातात आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. त्याच्यावर मोठा आर्थिक ताण पडतो त्यामुळे या साथीच्या आजारावर तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात अशी सूचना आमदार जगताप यांनी केली.
त्यावर आयुक्त गोरे यांनी यासंदर्भात लगेचच उपाययोजना करण्यात येतील औषध फवारणी धूर फवारणी करण्यात येईल डेंगू बाबत विविध माहिती पोस्टर ठिकाणी लावण्यात येतील जेणेकरून नागरिकांमध्ये जागृती निर्माण होईल. डेंगूच्या डासाचे उपत्ती स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे स्वच्छ पाणी अधिक काळ नागरिकांना साठवून ठेवू नये. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळण्याबाबत आवाहन करण्यात येईल घंटागाडी वर जनजागृतीचे ध्वनिफीत वाजविणे याबाबत सूचना करण्यात आल्याचे आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले
आमदार जगताप यांनी कोविल काळात शहरात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल महापालिका आणि आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक केले. आजही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढलेले दिसत असले तरी शहरात मात्र ती संख्या कमी आहे याचा अर्थ कोरोना रुग्णसंख्या नियंत्रित करण्यात आपल्याला यश आले आहे. यात महापालिका आरोग्य विभागाचे चांगले काम आहे शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण सुरू आहे.नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.
रस्त्याचे पॅचिंगचे काम लवकरच सुरू होणार
शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती घेण्याची सूचना आमदार जगताप यांनी केली त्यावर त्यांच्या कामाचे पूर्ण तयारी झाली असून पाऊस थांबल्यास लगेच ते काम हाती घेण्यात येईल अशी माहिती आयुक्त गोरे यांनी यावेळी दिली.
शहरातून जाणाऱ्या कल्याण रोड राष्ट्रीय महामार्गाचे दुरवस्थेचा विषय बैठकीत घेण्यात आला शिवाजीनगर ते नेप्ती नाका चौक ते आयुर्वेदिक कॉर्नर पर्यंत या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहेत सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार आठ दिवसात हाती घेईल पाऊस थांबल्यानंतर दर्जेदार काम करून घेण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले बैठकीस आयुक्त शंकर गोरे. उपायुक्त यशवंत डांगे. आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर. नगरसेवक मनोज दुलम. यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.