सामाजिक कार्यकर्त्या बंदिनी मारकड यांनी स्वच्छता कर्मचार्‍यांसोबत केला दीपावलीचा सण साजरा.

0
90

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत येथील सामाजिक कार्यकर्त्या बंदिनी श्रीकांत मारकड यांनी कर्जत नगरपंचायत चे स्वच्छता कर्मचार्‍यांच्या सोबत दीपावलीचा सण साजरा केला.

कर्जत येथे प्रभाग ९ मध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या बंदिनी श्रीकांत मारकड यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने दीपावलीचा सण साजरा केला.कर्जत नगरपंचायत चे शहरातील घाणीचे साम्राज्य दूर करून  परिसर स्वच्छ ठेवणारे स्वच्छता कर्मचारी हे सातत्यानं काम करत असतात. दीपावलीच्या सण असताना देखील हे कर्मचारी स्वच्छतेचे काम मोठ्या निष्ठेने करताना दिसून येतात.अशा या कर्मचाऱ्यांच्या सोबत बंदिनी श्रीकांत मारकड यांनी दीपावलीचा सण साजरा केला.

या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी मिठाई वाटप करून त्यांची दीपावली गोड करत एक सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या उपक्रमामुळे नगरपंचायती कर्मचारी देखील भारावून गेले होते.त्यांनी देखील आमच काम पाहून कोणीही आमच्याशी संवाद साधत नाही,मदत करणे तर दूर अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त केली व बंदिनी मारकड यांचे या सर्व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

कचरा डेपो मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना देखील त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन त्यांच्या स्वच्छतेच्या कामाचे बंदिनी मारकड यांनी कौतुक केले,त्यांच्या सोबत संवाद साधला,त्यांच्या कामाची माहिती करून घेतली व प्रचंड अशा घानीमध्ये देखील या महिला कर्मचारी मोठ्या उत्साहाने काम करताना पाहून श्रीमती मारकड यांनी त्यांचे विशेष कौतुक केले व त्यांनाही दीपावलीच्या शुभेच्छा देत मिठाई दिली.

कर्जत शहरातील सर्व नागरिकांना नगरपंचायत च्या सर्व कर्मचाऱ्यांची कामाची दखल घेऊन सर्वांनी यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. श्रीकांत मारकड हे माजी सैनिक असून ते देखील सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here