सामाजिक जाणिवेतूनच वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रात पदार्पण : देवचके

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सामाजिक जाणिवेतूनच वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रात पदार्पण : देवचके

सुरभी हॉस्पिटलच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल दीनदयाळ परिवाराच्या वतीने सत्कार

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : पत्रकारितेत विविध पदांवर कार्यरत असताना वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित मदतीसाठीचे फोन यायचे तेव्हा या क्षेत्रा त आपले जवळचे कोणीतरी असले पाहिजे तरच आपल्याला तातडीने वैद्यकीय मदत सवलतीच्या दरात मिळू शकते हे जाणवले. सुरभी हॉस्पिटल सोबत काम करण्याची ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी याच सामाजिक जाणिवेतून आपण वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश केल्याचे ज्येष्ठ पत्रकार व श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचके यांनी सांगितले.

सुरभी हॉस्पिटलच्या चेअरमनपदी त्यांची निवड झाल्याबद्दल दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पंडित दीनदयाळ ळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या आनंदी बाजार येथील मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. पतसंस्थेचे चेअरमन भाजपा नेते वसंत लोढा, बाळासाहेब भुजबळ यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की पत्रकारितेमध्ये तीस वर्षे काम करताना आपण जो सेवाभाव जपण्याचा प्रयत्न केला तोच आपण पुढे आरोग्य सेवा देताना जपणार आहोत मोठ-मोठी हॉस्पिटल ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळी सामान्य माणसाला या हॉस्पिटलमध्ये आपण जावं की नाही असा प्रश्न पडतो कारण सेवा मिळेल की नाही ते आपल्याला परवडेल की नाही असे प्रश्न उभे राहतात तेव्हा त्या ठिकाणी आपला हक्काचा माणूस असावा असे प्रत्येकाला वाटते या पुढील काळात कुणालाही अशी भीती बाळगण्याचे कारण नाही सुरभी हॉस्पिटल संबंधित सर्व सेवा योग्य दरात आणि आपल्याशी संबंधित सर्वांना प्राधान्याने पुरवण्याचा आपण यथा शक्ती प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी बोलताना चेअरमन वसंत लोढा म्हणाले की पंडित दीनदळ पतसंस्था आणि परिवार यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले अनिरुद्ध देवचके यांनी काम करताना सतत सेवाभाव जपला आहे. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर त्यांनी पत्रकारिता राजकारण समाजकारण अर्थकारण अशा सर्व क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळवलेला आहे आता  मोठ्या व्यवस्थापना खाली असलेल्या नगरच्या आरोग्य सेवेला मोठी उभारी देणाऱ्या सुरभी हॉस्पिटलच्या चेअरमन पदी त्यांची निवड झाल्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये आमचा हक्काचा माणूस त्या पदावर पोहोचल्याने पतसंस्था आणि परिवाराच्या सदस्याला मोठे समाधान आहे. अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये आमच्यापैकी कोणाला मदत लागली तर ती सहज उपलब्ध होईल हा आत्मविश्वास आम्हाला मिळाला.यावेळी संस्थापक श्री वसंत लोढा, बाळासाहेब भुजबळ, सोमनाथ चिंतामणी, महावीर कांकरिया, संग्राम म्हस्के, राजकुमार जोशी, माऊली मामा गायकवाड, बाबासाहेब साठे, निलेश लोढा, निलेश चिपाडे, विक्रम शिंदे, अमोल भांबरकर, राजेश कुसाळकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!