मनपाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन
सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले – आयुक्त डॉ. पंकज जावळे
नगर : शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते .शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती तसेच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले. सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली असे प्रतिपादन आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने आयुक्त पंकज जावळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे, उपायुक्त श्रीकांत पवार, मुख्य लेखाधिकारी सचिन धस, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, अनिल लोंढे आदी उपस्थित होते.