सारसनगर येथे श्री  क्षेत्रअक्कलकोट देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थ पादुका व पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

- Advertisement -

सारसनगर येथे श्री  क्षेत्रअक्कलकोट देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थ पादुका व पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

श्री स्वामी समर्थ यांचे विचार अंगीकारून समाजामध्ये वाटचाल करावी – आ. संग्राम जगताप

नगर : धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्र येऊन साधू संतांच्या विचाराची देवाण-घेवाण होत असते, या माध्यमातून समाज देखील घडण्याचे काम होत असते, स्वामी समर्थ त्यांनी समाजाला संबोधित करत सांगितले की, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माध्यमातून समाजामध्ये धार्मिकतेची ऊर्जा व प्रेरणा मिळत असते, सारसनगर येथील राजेंद्र बेंद्रे यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ पादुका व पालखी सोहळ्याचे उत्साहात आगमन झाले, सारसनगर येथे श्री स्वामी समर्थ यांचे भव्य दिव्य मंदिर उभे राहिले आहेत या माध्यमातून बालकांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते त्यांचे सुरूअसलेले धार्मिकतेचे कार्य कौतुकास्पद आहे भाविकांना पालखीच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे घरबसल्या दर्शन घडविण्याचे काम केले जात असल्यामुळे मी देवस्थानचे आभार मानतो भाविकांनी श्री स्वामी समर्थ यांचे विचार अंगीकारून समाजामध्ये वाटचाल करावी असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सारसनगर येथे राजेंद्र बेंद्रे यांच्या निवासस्थानी श्री क्षेत्र अक्कलकोट देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थ पादुका व पालखी सोहळ्याचे स्वागत आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आरती संपन्न झाली, या प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रा. माणिकराव विधाते, बंडू बोगावत, भाऊसाहेब बेंद्रे, धर्मा करंडे मळू गाडळकर, डॉ. संदीप सुपेकर, सुनील भनभणे, महेश भनभणे, अशोक निमसे,सुवर्णा बेंद्रे, भारती बेंद्रे, शिंदे सर आदी उपस्थित होते.
राजेंद्र बेंद्रे म्हणाले की अनेक वर्षांपासून श्रीक्षेत्र अक्कलकोट देवस्थानची स्वामी समर्थ पादुका व पालखी सोहळा सारसनगर येथे येत असून या भागातील भाविक वर्ग मोठ्या संख्येने भक्तीभावाने दर्शन घेत असतात, यावेळी भाविक आपल्या घरासमोर रांगोळी काढत पालखीचे पूजन करत असतात पालखी सोहळ्यामुळे नागरिकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण होत असते असे ते म्हणाले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!