सारोळा कासार येथील मल्लांनी हगामा चांगलाच गाजविला..
अहमदनगर – सारोळा कासार येथे हजरत निर्गुण शहावली बाबा यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या जंगी हगाम्यात सारोळा कासार येथील मल्लांनी हगामा चांगलाच गाजविला.. काही क्षणातच मल्लांना आसमान दाखवित हजारो रुपायाचे बक्षिस मिळवले.
सारोळा कासार ( ता.नगर ) येथे तीन दिवस यात्रा भरते.पाहिल्या दिवशी संदल ,दुसऱ्या दिवशी मिरवणुक, तिसऱ्या दिवशी भव्य जंगी हगाम्याचे आयोजन केले होते. या हगामयात तिनशे मल्लांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे सारोळ्याच्या मल्लांची उपस्थिती मोठया प्रमाणात होती. महाराष्ट्रातून मल्लांनी या हगाम्याला हजेरी लावली पाचशे रुपायापासून ते पन्नास हजार रुपाया पर्यत कुस्त्या लावण्यात आल्या. येथील मल्लानी हगामा चांगलाच गाजवला व प्रेक्षकांकडून हजारो रुपायाची बक्षिस मिळवले.दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान , स्पर्धा परीक्षा व इतर पदावर ज्यांची नियुक्ती झाली अशा सर्व सर्वांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला.
या हंगाम्यात पंच म्हणून राजाराम धामणे, बब्बू इनामदार, बापू काळे, पैलवान शंकर खोसे यांनी काम पाहीले. या यात्रेचे नियोजन यात्रा कमिटी व ग्रामस्थानी केले .
याचा केला सन्मान – नाझिया तांबोळी ( सहाय्यक कृषी अधिकारी ) ,विद्या गोरख प् एमबीबीएस पूर्ण विद्या संकेत काळे (आयटीआय प्राध्यापक ), सोनाली बाळासाहेब धामणे (आरोग्य सेविका ) आदींचा सन्मान करताना समस्त ग्रामस्थ.
- Advertisement -