सावेडीत मोजणीच्या नावाखाली जागा बळकाविणाऱ्यावर कारवाई व्हावी

- Advertisement -

सावेडीत मोजणीच्या नावाखाली जागा बळकाविणाऱ्यावर कारवाई व्हावी

अशिक्षित विधवा महिलेची जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

ऑनलाईन उताऱ्यावर नावे समाविष्ट करुन बोगस नावे कमी करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर आणि उपनगरात मोकळे भूखंड, शेत जमीन व घरांवर ताबेमारीचा प्रस्थ वाढत असताना, पाईपलाईन रोड, वाणी नगर येथील 70 वर्षीय अशिक्षित विधवा महिला वेणूबाई विठ्ठल वाणी यांनी जागा मोजणीच्या नावाखाली जागा बळकाविणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तर प्रांत अधिकाऱ्याच्या आदेशाने नावे खुद्द व वस्तीपड म्हणून लागलेली असताना ऑनलाईन उताऱ्यावर नावे समाविष्ट करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करुन सावेडी तलाठी दखल घेत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
वेणूबाई वाणी यांची पाईपलाईन रोड, वाणी नगर, सावेडी  येथील सर्व्हे नंबर 25/1 ब, क, ड या मिळकतीमध्ये अडीच एकर क्षेत्र आहे. त्यांना तीन मुले असून, त्या आजही शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सदर शेत जमीनीवर मागील 50 वर्षापासून त्यांची मालकी व ताबा आहे. मुले लहान असताना मुलांना जीवे मारण्याची धमकी देत कागदपत्रांवर अंगठे घेण्यात आले होते. यानंतरही सदर जागा बळविण्याच्या हालचाली सुरु होत्या. 2011 साली प्रांत अधिकाऱ्याच्या आदेशाने 7/12 उताऱ्यावर वेणूबाई विठ्ठल वाणी व इतरांची नावे खुद्द व वस्तीपड म्हणून नोंद झालेली आहे. मात्र पवनकुमार नंदकिशोर अग्रवाल, आनंद प्रदीपकुमार अग्रवाल (रा. नगर), हेमलता नवनाथ म्हस्के, राम शंकर शेळके (रा. उक्कडगाव, ता. नगर) हे व्यक्ती सदर शेत जमीन खरेदी केला असल्याचा दावा करुन मोजणीच्या नावाखाली शुक्रवारी (दि.19 एप्रिल) पाईपलाईन रोड येथील राजकीय वरदहस्त असलेले बिल्डर्स व गुंड यांच्यासह पोलीस बंदोबस्तामध्ये आले होते. मोजणीच्या नावाखाली जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर वॉल कंपाऊंडचे साहित्य देखील मोजणी करताना आणण्यात आले होते. ही मोजणी आंम्ही हाणून पाडली असल्याचे वाणी यांनी स्पष्ट केले आहे.
भूमी अभिलेख उपाधीक्षक यांच्याकडे मोजणीला हरकत घेऊन देखील, मोजणीचा प्रयत्न करण्यात आला. मोजणी करताना इतर बांधावरील जागा मालकांना नियमाप्रमाणे कोणत्याही नोटीसा देण्यात आलेल्या नव्हत्या. या शेत जमीनीचा ताबा सोडण्यासाठी संबंधीत व्यक्तींकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून, याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज देण्यात आलेले आहे. जागा बळकाविणाऱ्यांमागे राजकीय वरदहस्त असल्याने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली जात नाही व महसुल यंत्रणा देखील सहकार्य करत नाही. सावेडी तलाठी वारंवार अर्ज करुनही ऑनलाईन पीकपाणीची नोंद घेत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जागा बळकाविण्याच्या उद्देशाने मोजणीची कोणतीही नोटीस न देता पोलीस यंत्रणा व भूमी अभिलेख कार्यालयातील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरुन जमीन मोजणीचा प्रयत्न करण्यात आला. भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारीने मोजणी सुरु केली असता, मिळकतीचा वाद चालू असताना मोजणीला जोरदार हरकत घेऊन मोजणी थांबविण्यात आली. अशिक्षितपणाचा फायदा घेऊन मोजणीच्या नावाखाली जागा बळकाविणाऱ्यावर कारवाई करुन, तलाठी यांच्या आदेशाने नावे खुद्द लागलेली असताना ऑनलाईन उताऱ्यावर नावे समाविष्ट करुन बोगस नावे कमी करुन न्याय मिळण्याची मागणी वाणी यांनी केली आहे.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!