सिद्धार्थ नगर भागातील माजी नगरसेवकाने केले अतिक्रमण पाडून कारवाई करण्याची मागणी

- Advertisement -

सिद्धार्थ नगर भागातील माजी नगरसेवकाने केले अतिक्रमण पाडून कारवाई करण्याची मागणी

सिद्धार्थ नगर भागातील नागरिकांच्या वतीने मनपा उपायुक्त यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी राहत असलेल्या मुन्सिपल कॉलनी येथे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी विनापरवानगी जास्तीचे वाढीव बांधकाम केलेले आहे. त्यामुळे त्यांचे हे अतिक्रमण त्वरित पाडण्यात यावे व त्यांच्या पत्नी सौ.शिला चव्हाण यांना अपात्र करून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना देताना अक्षय जाधव, मनोज जाधव, सागर पगारे, विशाल साठे, शरद कांबळे, प्रेम साठे, सागर भावले आदी उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, राहत्या घराचे मोजमाप करून घर बांधतानाची परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र पहाणी करावे याचप्रमाणे प्रमाणपत्राप्रमाणे बांधकाम आहे किंवा नाही ते पाहून कारवाई करण्यात यावी तसेच सर्जेपुरा लाल टाकी रोडवर जे वीर गोगादेव मंदिर आहे तेथे चव्हाण कुटुंबीयांनी अतिक्रमण केलेले आहे. ती सर्व जागा शासनाची आहे त्यांनी समाजाची व नगरपालिकेची फसवणूक करून सर्व जागा आपल्या ताब्यामध्ये ठेवली असून या मंदिरामागे अनधिकृतपणे ऑफिस केलेले आहे व त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग झालेले आहेत त्यामुळे ऑफिस लवकरात लवकर पाडण्यात यावे व चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles