सिद्धार्थ नगर येथे माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी) – सिद्धार्थ नगर येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची ८९ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
त्रिसरण पंचशील बुद्ध पूजा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व माता रमाई यांनी केलेला त्याग व समर्पणामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली साथ याचे स्मरण करण्यात आले. व जर रमाईने बाबासाहेबांना साथ दिली नसती तर बाबासाहेब घडले नसते जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचा इतिहास सांगितला जाईल तेव्हा माता रमाईची आठवण काढावीच लागेल असे भारतीय बौद्ध महासभेचे प्रथम शहर अध्यक्ष बौद्धचार्य दीपक बाजीराव पाटोळे यांनी सांगितले व माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना बौद्धचार्य दीपक पाटोळे समवेत माजी शहराध्यक्ष राहुल कांबळे, बौद्धचार्य लक्ष्मण माघाडे, गौतम पाचारणे, सिद्धार्थ नगर जयंती समितीचे अध्यक्ष सागर पाखरे, काकासाहेब गायकवाड, योहान गायकवाड, प्रतीक सोनवणे, दादूभाऊ कांबळे, संघराज गायकवाड, गोपीचंद पडागळे, वैभव सोनवणे, हर्षल भोसले, संजय गायकवाड, पवन गायकवाड आदी उपस्थित होते.