सिना नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी राज्य शासनाचा निधी उपलब्ध करून देऊ – मंत्री अनिल पाटील

0
50

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सिना नदीची केली पाहणी

नगर – शहरातून वाहत असलेल्या सिना नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी आमदार संग्राम जगताप हे प्रयत्नशील असून त्यासाठी ते शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. लवकरच या कामासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करून मोठा निधी उपलब्ध करून देऊ, या माध्यमातून सिनानदीचे सुशोभिकरण देखील होईल, तसेच सिना नदीला पावसामुळे येणाऱ्या पुराचा प्रश्न मार्गी लागेल, शहरवासियांसाठी चांगली सुविधा होईल असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

    नगर शहरातील सिनानदीची मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी केली यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आ.संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, महादेव कराळे आदी उपस्थित होते.

    यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहरात सिनानदीचे पात्र सुमारे १३ किमीचे असून यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे, पावसामुळे येणारा पुराचे पाणी नगर शहरातील काही भागांमध्ये नागरिकाच्या घरात दुकानात शिरत असते यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते, त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी नदीतील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे, याच पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सिनानदीची पाहणी करत या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली अशी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here