सिव्हिल हाडको परिसरातील न्यायप्रविष्ट असलेल्या मनपाच्या मालकीच्या भूखंडावर अनधिकृत ताबा

- Advertisement -

सिव्हिल हाडको परिसरातील न्यायप्रविष्ट असलेल्या मनपाच्या मालकीच्या भूखंडावर अनधिकृत ताबा

खाजगी व्यवसायांना जागा भाड्याने देऊन लाखोंचा महसूल होतोय जमा महानगरपालिकेचे दुर्लक्ष

अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा जनता बांधकाम हटवेल सकल हिंदू समाजाचे महानगरपालिकेला निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी परिसरातील मिस्किन मळा व सिव्हिल हडको जवळ असणाऱ्या  सय्यद हाजी हमिद तकीया ट्रस्टचा सिव्हिल हाडको या परिसरात मोकळा भूखंड असून सदर जमिनी बाबत अहमदनगर महानगरपालिका व ट्रस्ट यांच्यामध्ये न्यायालयात वाद सुरू असूनही भूखंडावर  महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय मोठमोठे शेड उभारून ते भाड्याने देऊन पैसे कमवण्याचा धंदा सध्या जोरात सुरू आहे. विविध फायनान्स कंपनीच्या ओढून आणलेल्या चार चाकी व दू चाकी गाड्या या ठिकाणी लावल्या जातात त्यासाठी गोडाऊनचा वापर म्हणून या मोकळ्या भूखंडाचा वापर केला जात आहे.

मात्र यामुळे या परिसरातील रहिवाशांना गुंडांचा त्रास होत असून लोक या ठिकाणी रात्री अपरात्री येत असल्यामुळे आणि आरडाओरड करून गदारोळ करत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रासाला समोर जावे लागत आहे. मात्र याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दमदाटी करण्याचे प्रकारही या ठिकाणी होत असून रात्री अप रात्री मोठमोठे टोळके या परिसरात या गोडाऊनमध्ये बसलेले असतात त्यामुळे त्यांच्या सुरू असलेल्या रोजच्या आरडाओरडीमुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मारहाण करणे व दमदाटी करणे हा प्रकार सुरू असून या भूखंडाबाबत सध्या न्यायालयात वाद सुरू असून सुधा काही ठराविक लोक या भूखंडावर अनधिकृतपणे गोडाऊन बांधून ते फायनान्स कंपनीला भाड्याने देत आहेत आणि त्यातून पैसा मिळत असल्याचं आरोप निवेदनात करण्यात आले आहे.

महानगरपालिकेने या ठिकाणी असलेले अनधिकृत फायनान्स कंपनीचे गोडाऊन काढून टाकून कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त यांना देताना सकल हिंदू समाजाचे घनश्याम बोडखे, सागर ठोंबरे, अक्षय हंपे, मनोज औशीकर, शहदेव पालवे, ऋषी लगड, अंकुश वामन, तुषार तोडमल, शुभम बेद्रे, प्रतीक लालबोन्द्रे, साहिल साळवे आदी उपस्थित होते. अन्यथा लवकरात लवकर अहमदनगर महानगरपालिकेने कारवाई केली नाही तर सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून जन आंदोलन करणार असल्याचे निवांत म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles