सीना नदी वरील खराब रस्त्यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडल्या – मा.विरोधी पक्षनेता संजय शेंडगे

0
93

कल्याण रोड सीना नदी वरील रस्त्याच्या कामाची नगरसेवकांनी केली पाहणी

अहमदनगर प्रतिनिधी – कल्याण राष्ट्रीय महामार्ग नगर शहरातून जात आहे या रस्त्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला असतानाही प्रशासन व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अर्धवट अवस्थेत रस्त्याचे काम पडले आहे. सीना नदी पुलावरील रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे.नागरिकांना प्रवास करत असताना आपला जीव मुठीत धरून करावा लागत आहे.
कल्याण रोड परिसरामध्ये मोठी लोकवस्ती झाली आहे. या सीना नदी पुलावर खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत होते.प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरवठा करूनही ठेकेदार काम करण्यास तयार नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून नागरिक या खराब रस्त्यांवरून प्रवास करीत आहे.अखेर सीना नदी वरील रस्त्याच्या कामाचा मुहूर्त सापडला असून आज ते काम सुरू झाले आहे अशी माहिती मा.विरोधी पक्षनेता संजय शेंडगे यांनी दिली.
कल्याण राष्ट्रीय महामार्गाच्या सिना नदीवरील पुलावरील रस्त्याचे काम सुरू झाले असून पाहणी करताना मा.विरोधी पक्षनेता संजय शेंडगे,समवेत नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे, नगरसेवक सचिन शिंदे आदीसह अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here