सी एस आर डी कॉलेज एमएससीबी कार्यालय ते कानडे मळा प्रलंबित रस्त्याचे कामाला सुरुवात

- Advertisement -

सी एस आर डी कॉलेज एमएससीबी कार्यालय ते कानडे मळा प्रलंबित रस्त्याचे कामाला सुरुवात

एमएससीबी विभागाच्या प्रलंबित कामामुळे रस्त्याच्या कामाला अडथळा निर्माण झाला – आमदार संग्राम जगताप

नगर : शहरातील रस्ते एकमेकाला जोडून वाहतुकीचा मार्ग निर्माण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करून घेतला आहे, सी एस आर डी कॉलेज एमएससीबी कार्यालय ते कानडे मळा ते सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाले, बहुतांश रस्त्याचे काम देखील पूर्ण झाले, मात्र एमएससीबी विभागाच्या प्रलंबित कामामुळे कार्यालयासमोरील काम बंद पडले होते, मधल्या काळामध्ये दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामुळे शटडाऊन घेता येत नव्हते आता विद्युत तारा व डीपी स्थलांतरितचे काम सुरू झाले आहे.

त्यामुळे या डीपी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे, कुठलेही विकास कामे करीत असताना अडचणी निर्माण होत असतात त्या सोडवत शहर विकासाची कामे पूर्ण करावी लागतात कानडे मळ्याजवळील भिंगार नाल्यावर आरसीसी पुलाचे काम देखील मार्गी लागणार आहे, लवकरच सीएसआरडी कॉलेज ते कानडे मळा सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या डीपी रस्त्याचे काम पूर्ण होऊन नगरकरांना नवीन वाहतुकीसाठी मार्ग उपलब्ध होणार आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles