सुनित ढगे यांना समाजभुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हमाल पंचायतच्यावतीने सत्कार

0
107

अहमदनगर प्रतिनिधी – आज समाजात चांगले काम करणार्‍यांची गरज आहे, सध्या कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत भर पडलेली आहे. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्याचे काम समाजातील मान्यवरांनी करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रत्येक समाजातील कार्यकर्ते आपआपल्या पद्धतीने काम करत आहे. त्यांच्या या कार्याची समाजही दखल घेऊन त्यांना पुरस्कार रुपाने प्रोत्साहन देत आहे. सुनित ढगे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. मित्र परिवारांच्या सहकार्याने गरजूंना मदत करुन त्यांचे दु:ख कमी करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन दिलेला ‘समाजभुषण पुरस्कार’ आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.

     अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनित ढगे यांना समाजभुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने त्यांचा जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, संजय महापुरे, नवनाथ लोंढे, तबाजी कार्ले, अर्जुन शिंदे, कुणाल तुपे, संदिप बडे, अमोल कोठूळे, मारुती राऊत, गंगाराम थोरात, उमेश सोनवणे, सचित ढगे आदि उपस्थित होते.

     सत्कारास उत्तर देतांना सुनित ढगे म्हणाले, समाजात अनेक गरजू लोक आहेत, त्यांना मदतीचा हात देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात असण्याचे काम आपणा सर्वांना करावाचे आहे. त्यासाठी मित्र परिवाराच्या सहकार्याने त्यांना मदतीचा हात देत असतो. या कार्याची दखल घेत अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने दिलेला पुरस्कार हा माझ्या एकट्याचा नसून आपणास सहकार्य करणार्‍यांचा आहे. हमाल पंचायतीच्यावतीने माझा गौरव करुन केलेल्या सत्कारामुळे आपणास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे यांनी सुनित ढगे यांच्या कार्याचा गौरव करुन हमाल पंचायतीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सचिव मधुकर केकाण यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here