सुरुडी ग्रामपंचायत पाठींब्याचे पत्र बीड आगार एस.टी.कर्मचारी विठ्ठल साबळे यांच्याकडे सुपूर्द

0
120

बीड प्रतिनिधी : एस.टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस.टी कामगार राज्यात बेमुदत संपावर आहेत.एस.टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची एस.टी कामगारांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने एस.टी कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

गेल्या महिन्याच्या २७ तारखेपासून एसटी कामगार टप्प्या-टप्प्याने संप करून आपले आगार बंद करत आहेत.एसटी कर्मचारी अतिषय तुटपुंज्या पगारात काम करत असून त्यांची उपजीविका भागत नसल्याने गेला वर्षभरात ३४ एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत.तर ५ /६ लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.सुदैवाने ते बचावले मात्र त्याला कारणीभूत आहे कमी पगार.

एसटी कर्मचारीची मागणी,
(1) महामंडळ चे महाराष्ट्र सरकार मध्ये विलीनीकरण
(2) सरकारी कर्मचारी प्रमाणे वेतन व भत्ते
(3) आत्महत्या केलेल्या कर्मचारी च्या कुटुंबातील व्यतीला आर्थिक मदत

या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्याची आहे.

या एस टी कामगारांना समर्थन म्हणून आता अनेक ग्रामपंचायतीनी देखील पाठींबा दिलाय.यांमध्ये आष्टी तालुक्यातील सुरुडी ग्रामपंचायतीने देखील परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून आपला पाठींबा दर्शवला आहे.

यावेळी सरपंच पती अशोक गर्जे यांनी सुरुडी ग्रामपंचायत पाठींब्याचे पत्र बीड आगार एस.टी.कर्मचारी विठ्ठल साबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात केले व ग्रामपंचायतीच्या वतीने आपला पाठींबा दर्शविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here