अपंग दिनानिमित्त राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी स्वखर्चातून केले सायकलचे वाटप
अहमदनगर प्रतिनिधी – जागतिक अपंग दिनानिमित्त राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी स्वखर्चातून दिव्यांग व्यक्तींना सायकलचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते केले.सुरेश बनसोडे यांनी सामाजिक भावनेतून केलेल्या या कार्याचे आमदार संग्राम जगताप यांनी कौतुक केले.
जागतिक अपंग दिन या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे व त्यांच्या सहकारी मित्रांनी एका अपंग व्यक्तीला त्याची गरज ओळखून त्याला दिलेली ही भेट निश्चितच त्याच्या कामी येणार आहे या पुढील काळातही अशा गरजू व्यक्तींना राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मदत केली जाईल असे आश्वासन यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माणिकराव विधाते,उपमहापौर गणेश भोसले,नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील,निखिल वारे,अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव,मोना विधाते, सुरेश वैरागर,सतीश साळवे,पप्पू पाटील यांच्यासह राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.