सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे : खा. डॉ. सुजय विखे पाटील

- Advertisement -

सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे : खा. डॉ. सुजय विखे पाटील

पाथर्डी  (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकापुर्तीच्या कालखंडाचा उल्लेख करताना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे होय. या काळात अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्याने देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यामुळे पं. मोदी यांची विकासाचे मॉडेल जगभर गाजत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भगवानगड येथील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचार सभांना सुरवात केली. ते भारजवाडीतील प्रचार सभेत बोलत होते.
अहिल्यानगर लोकसभेचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात आला असुन महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि इतर मित्र पक्षांनी त्यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेण्याचे काम सुरू केले आहे. याच धर्तीवर भारजवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आम. मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, तालुका अध्यक्ष मृत्यंजय गर्जे, बाळासाहेब गोल्हार, अजय रक्ताटे, प्रतिक खेडकर, माणिकराव बटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविला आहे. गरीब कल्याण योजनेच्या माध्यामातून ८० कोटी हून अधिक परिवार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. ५० कोटी हून अधिक लोकांना जनधन योजनेचा लाभ मिळाला आहे. ३४ कोटी हून अधिक लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यामातून आरोग्य कवच प्राप्त झाले आहे. ४ कोटी हुन अधिक लोकांचे पीएम आवास योजनेच्या माध्यातून पक्क्या घराचे स्वप्न पुर्ण झाले आहे. तर १४ कोटी हून अधिक लोकांना जल जीवन मिशनच्या रुपाने शुद्ध पाणी मिळाले आहे. मागील १० वर्षात २५ कोटीहून अधिक लोक गरीबीतून मुक्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यामुळे सामान्य माणसाचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला आहे. देशात मोदींची हमी बोलत आहे. त्यामुळे विरोधकांच्या भुलथापांना मतदार बळी पडणार नाहीत. देशात पुन्हा मोदींचे सरकार येणार असून महायुतीचा प्रत्येक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडुण येणार यात आता कोणतीही शंका उरली नसल्याचे त्यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातही मोदी सरकारच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून अनेक विकासकामे झाली असल्याने नगरची जनता सुद्धा पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचा विश्वास खा. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!