अहमदनगर प्रतिनिधी : विक्रम लोखंडे
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे महत्वाचे आहे. वाढदिवसाला केक कापणे, फटाके वाजवो, हारतुरे स्विकारण्याऐवजी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावल्यास एक सत्कर्म केल्याचे समाधान लाभते. निसर्गाचा समतोल साधला तरच मानवाला चांगले जीवन जगता येईल. संतांनीही वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश शेकडो वर्षांपूर्वी दिला आहे. त्याचे प्रत्यक्ष कृतीतून अनुकरण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केडगाव येथील राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल झिरपे यांनी केले.
अनिल झिरपे यांचे लहान बंधू सुशिल झिरपे यांचा वाढदिवस व्यापक वृक्षारोपण अभियान राबवून साजरा करण्यात आला. केडगाव परिसरासह नगर तालुक्यातील बाबुर्डी, वाळकी, देऊळगाव सिध्दी, बाबुर्डी चोभे, घोसपुरी या गावांमध्ये राजे प्रतिष्ठानने वृक्ष लागवड करून ग्रामस्थांमध्येही जनजागृती केली.
योवळी सतिश खैरे, शिवसेना तालुका उपप्रमुख संदिप परभणे, दिगंबर भानुदास कोतकर, अक्षय सुरोशे, अभिजित परभणे, ईरफान शेख, संदिप तावरे, नवनाथ गिरवले, अनिल बोठे, सुभाष जाधव, संघराज जगताप, सुमित गायकवाड, सनी शेठ दहिगावकर, सलिम शेख, साईनाथ कोतकर, महेश गाडेकर आदी उपस्थित होते.
झिरपे बंधूंनी अनाथ मुलांना मिष्टान्न भोजन तसेच मनोविकलांगांना थंडीचे उबदार कपडे देवून वाढदिवसाचा आनंद व्दिगुणित केला.