सेवानिवृत्ती बद्दल सरला बनकर यांचा सत्कार

0
86

नेवासा फाटा – कमलेश गायकवाड

तालुक्यातील वाकडी येथील अंगणवाडी मदतनीस सरला बाळू बनकर प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांनी हृदय सत्कार केला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांच्या वतीने श्रीमती बनकर यांना निरोप देण्यात आला. यावेळी गावचे सरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अनेकांनी श्रीमती बनकर यांच्या कार्याला उजाळा दिला. श्रीमती बनकर यांना निरोप देताना ग्रामस्थांना भावना अनावर झाल्या.

३०० रुपये महिना पगारापासून सरला बनकर यांनी सेवेची सुरवात केली.अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये सरला ताई यांनी आपला संसार चालवला सेवेत लागल्यानंतर काही काळातच त्यांच्या पतीचे दुःखद निधन झाले. अशा परिस्थितीत सरलाबाई यांच्यावर दोन मुली एक मुलगा यांची जबाबदारी होती.

अतिशय तुटपुंजा पगार मध्ये तीन मुलांचे शिक्षण तसेच घर चालवणे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. परंतु सरलाबाई यांनी डगमगून न जाता आपल्या लेकरांना चांगले शिक्षण दिले तसेच त्यांचे विवाह करून सरलाबाई यांनी वडिलांची देखील जबाबदारी पार पाडली. त्यांच्या हाताखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर विराजमान असल्याने विद्यार्थी घडवायचे काम त्यांनी केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मनापासून काम करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी परिसरातील लोकांमध्ये किती आपुलकी निर्माण केली ते या निमित्ताने दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here