सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या अहमदनगर डान्स आयडॉल स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

क्यूट बेबी कॉन्टेस्ट ठरली कार्यक्रमाचे आकर्षण;गरजू मुलीला व्यावसायिक प्रशिक्षणकरिता आर्थिक मदत

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन अहमदनगर डान्स आयडॉल व क्यूट बेबी कॉन्टेस्टला शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. विजेत्या स्पर्धकांना फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तर गरजू मुलीला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ब्युटी पार्लरच्या व्यावसायिक प्रशिक्षणकरिता आर्थिक मदत सेवाप्रीतच्या महिला सदस्यांनी दिली.

प्रास्ताविकात सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, परिस्थितीपुढे हार न मानता शिक्षणाने जीवन बदलणार आहे. आत्मविश्‍वास व जिद्दीने जग जिंकता येते. येणारी संकटे संधीच्या स्वरुपात येत असतात. कोरोनामुळे सर्व शाळा बंद असल्या तरी सेवाप्रीतने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा घेऊन त्यांच्या कलागुणांना चालना देण्याचे कार्य केले आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी सेवाप्रीत वर्षभर विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रुपच्या उपाध्यक्षा डॉ. सिमरन वधवा म्हणाल्या की, लहान विद्यार्थी उद्याच्या भारताचे भवितव्य असून, त्यांना सक्षम करण्याचे सेवाप्रीतचे संकल्प आहे. स्पर्धा ही स्वत:ला सिध्द करण्याचे व आपल्या मधील क्षमता ओळखण्याचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

सावेडी येथील फंक फ्युजन डान्स अ‍ॅण्ड फिटनेस स्टुडिओत झालेल्या बक्षिस वितरण कार्यक्रमात अहमदनगर डान्स आयडॉल स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनी नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. क्यूट बेबी कॉन्टेस्ट मधील लहान मुले या स्पर्धेचे आकर्षण ठरले. नृत्य स्पर्धेचे परीक्षण फंक फ्युजन डान्स अकॅडमीचे संदीप सर व नृत्य शिक्षिका नेहा कवडे यांनी केले. तर क्यूट बेबी कॉन्टेस्टचे परीक्षण इंटरनॅशनल फॅशन मॉडेल तेजल पाटील यांनी केले.

अहमदनगर डान्स आयडॉल स्पर्धेत लहान गटात (वयो वर्षे 4 ते 10) प्रथम- सृष्टी उद्मले, द्वितीय- सिमरकौर कथुरिया, तृतीय- क्रिशा विधाते, मोठा गट (वयो वर्षे 10 ते 16) प्रथम- समृध्दी कसोटे, द्वितीय- समायरा सबलोक, तृतीय- पायल घोरपडे, उत्तेजनार्थ- साक्षी भाटीया, तसेच क्यूट बेबी कॉन्टेस्ट मध्ये लहान गट (दीड वर्ष आतील मुले-मुली) प्रथम- अलमीरा साजिद शेख, कुंवर फतेहसिंग वधवा, द्वितीय- भाविश्का आकाश मुथा, तृतीय- चैत्रा प्रशांत गिरगुमे, मोठा गट (दिड ते तीन वर्षा आतील) प्रथम- सुर्या ओबेरॉय, द्वितीय- तन्वी नवलानी, तृतीय- अ‍ॅक्सल रॉबर्ट सँतोज यांनी बक्षिसे पटकाविली. या विजेत्या स्पर्धकांना उपस्थितांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू बक्षिस स्वरुपात देण्यात आली.

या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख दिप्ती सबलोक या होत्या. पाहुण्यांचे स्वागत व आभार गगन वधवा व तनिष्का कथुरिया यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेरी धुप्पड, हरमीतकौर माखिजा, पुनम नारंग, वंदना थापर, तनु थापर यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!