सैनिक बँकेत पुन्हा चेअरमन,संचालकांचा नातेवाईक नोकर भरतीचा घाट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विद्यमान संचालक सुदाम कोथिंबीरे यांचे सहकार आयुक्तांना पत्र

भरती प्रस्तावास परवानगी देऊ नये

अहमदनगर (प्रतिनिधी) – संचालक, नातेवाईकांना बँक सेवेत घेण्यासाठी पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने नोकर भरतीचा प्रस्ताव सहकार खात्याकडे पाठवला आहे.त्यामुळे बँकेच्या नोकर भरती प्रस्तावास सहकार आयुक्तांनी परवानगी देऊ नये, या मागणीचे पत्र  संचालक सुदाम कोथिंबिरे, कॅप्टन विट्ठल वराळ, बाळासाहेब नरसाळे, संपत शिरसाठ, मारुती पोटघन, विनायक गोस्वामी यांनी सहकार आयुक्तांना दिले आहे.

सहकार आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या चेअरमन व मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी काही संचालकांना हाताशी धरत आपल्या नातेवाईकांना बँकेच्या सेवेत घेण्यासाठी संचालक मंडळाच्या मासिक सभेत ठराव घेऊन आयुक्त कार्यालयात तात्पुरत्या नोकरभरतीचा प्रस्ताव पाठवला आहे.

सत्ताधारी संचालक मंडळाने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी स्वतःच्या आर्थिक हितासाठी आणि मागिल केलेले घोटाळे झाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नातेवाईक नोकरभरती करण्याचा घाट घातला आहे.४ डिसेंबर रोजी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिराती मध्ये किती जागा भराव्याच्या आहेत? याचा उल्लेख केला नाही.तसेच वसुलीसाठी तात्पुरती भरती करणार असल्याचे म्हटले आहे.

सदर भरतीस मेलवर अर्ज मागितले आहेत.त्यामुळे सहकार आयुक्त यांनी २९ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशाचे पालन केले नाही.सहकार विभागाची व सर्वसामान्य बेरोजगार युवकांचीं दिशाभूल करण्याचा डाव बँक मुख्यकार्यकारी आधिकार्‍याने दिलेल्या जाहिरातीत  दिसून येत आहे.

२०२० साली  झालेल्या कर्मचारी भरतीत अर्थपूर्ण व्यवहार झालेले होते.त्यामूळे सदर नोकर भरती रद्द करावी लागली होती.सहकार आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासत त्याच उमेदवारांना परत बँकेत भरती करण्याचा खटाटोप बँकेत चालवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपलेला आहे. तसेच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बँकेच्या संचालक मंडळाने पाच वर्षात केलेल्या गैरकारभाराची तक्रार केली होती.त्यानुसार सहकार आयुक्तांनी तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्त आर.सी.शाह यांना चौकशीसाठी नियुक्त केले आहे.

असे असतानाही केवळ मागील काढलेल्या नातेवाईकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठीच या काळजीवाहू संचालक मंडळाचा नोकर भरतीचा निर्णय आहे.संचालक मंडळास येत्या निवडणूकित फायदा होण्यासाठी ही भरती करण्याचा घाट घालण्यात आला आहे.

भरती मुळे बँकेवर आर्थिक बोजा वाढणार आहे व त्यामुळे बँक नुकसानीत जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे अवैध भरतीस कोणतीही परवानगी देऊ नये.नोकर भरतीस परवानगी दिल्यास व या संचालकांनी नातेवाईकांना सेवेत घेतल्यास सहकार कार्यालया समोर बँकेचे संस्थापक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाला बसणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.


 

सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की, आप आपल्या जबाबदारी वर अर्ज करावेत.या भरती प्रक्रियेला न्यायालयात दाद मागणार आहोत.त्यामुळे कोणाचे नुकसान झाल्यास त्यास आम्ही जबाबदार असणार नाही.कोणीही अर्थिक व्यवहार करू नयेत.

मागील रद्द झालेली भरती प्रक्रिया न्यायालयात प्रलंबित आहे.त्यामुळे सदर भरती बेकायदेशीर व नियमबाह्य आहे.मागील उमेदवारांनी अर्थिक व्यवहार केले असल्याने व काम केले नसल्याने त्यांनी पैसे द्या किंवा कामावर घ्या असा तगादा लावल्याने त्यांना गप्प करण्यासाठी व तक्रादारांनी तक्रार केल्यामुळे आम्ही तुम्हाला भरती करू शकत नाही,असे सांगून तात्पुरती वेळ मारून नेण्यासाठी ही भरती मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सुपीक डोक्यातुन निघून नोकर भरतीत हात बरबटलेले असल्याने संचालक मंडळाने त्यास मान्यता दिली आहे.

याचे विरोधात सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार केली आहे.त्यामुळे सदर भरती रद्द होणार आहे. याची सर्वानी नोंद घ्यावी, वेळ प्रसंगी यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठाऊ – विनायक गोस्वामी (सभासद)

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!